Rohit Sharma : टी20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज निवड झाली. रोहित शर्मा वनडे संघाचं नेतृत्व करणार आहे. त्याशिवाय, विराट कोहलीही संघात खेळणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, विराट-रोहितसह इतर काही सिनिअयर खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यात आराम देण्यात येणार असल्याचं समोर आले होते. पण गौतम गंभीर यानं रोहित आणि विराट कोहली यांनी श्रीलंका दौऱ्यात खेळावं, अशी मागणी केली होती. गौतम गंभीर कोच म्हणून पहिल्यांदाच टीम इंडियासोबत जाणार आहे. गौतम गंभीरच्या शब्दाला मान देत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी श्रीलंका दौऱ्यामध्ये खेळण्यासाठी होकार दिला. आज टीम इंडियाची निवड झाली. त्यामध्ये वनडेच्या संघामध्ये रोहित आणि विराट यांची नावं दिसत होती.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जहीर केली आहे. त्यामुळे यापुढे ते कसोटी आणि वनडेमध्ये खेळताना दिसणार आहेत. पुढील वर्षी चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे. त्याआधी भारताचे मर्यादीत वनडे सामने होणार आहेत. टीम इंडियाची घडी व्यवस्थीत बसवण्यासाठी रोहित आणि विराट हे दोन अनुभवी खेळाडू प्रत्येक वनडे सामन्यात असायला हवेत, असा आग्रह गौतम गंभीरचा होता. त्याच्या मागणीला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मान देत खेळण्यास होकार दिला.
टी20 विश्वचषकानंतर आता पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. शुभमन गिल याच्याकडे बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. त्याला वनडे आणि टी20 संघाचं उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला येण्याची शक्यता कमीच आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीपुढं आगामी काळातील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद भारताला मिळवून देण्याचं आव्हान असेल. श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाल्यास दोघे कशी कामगिरी करतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
वनडे मालिकेसाटी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
वनडे मालिकेचं वेळापत्रक काय ?
पहिला वनडे सामना - शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
दुसरा वनडे सामना - रविवार, 4 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
पहिला वनडे सामना - बुधवार, 7 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंब