एक्स्प्लोर

Team India Squad for Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर

Team India squad for Hong Kong Sixes 2026 : भुवनेश्वर कुमार गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघापासून दूर आहे. मात्र, आता त्याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

Team India squad for Hong Kong Sixes 2026 : भुवनेश्वर कुमार गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघापासून दूर आहे. मात्र, आता त्याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे. सात सदस्यीय संघात कृणाल पांड्या, नितीश राणा आणि शशांक सिंह यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारताचा पाकिस्तानसोबत एकाच गटात समावेश

हाँगकाँग सिक्सेस 2026 मध्ये एकूण 12 संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. भारताचा समावेश गट कमध्ये करण्यात आला असून, या गटात पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीचाही समावेश आहे. स्पर्धेतील सर्व सामने टिन क्वाँग रोड रिक्रिएशन ग्राउंडवर खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी आता भुवनेश्वर कुमारवर असेल.

भुवीच्या पुनरागमनाकडे सर्वांचं लक्ष

भुवनेश्वर कुमारसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. त्याने भारतासाठी अखेरचा सामना नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो राष्ट्रीय संघाबाहेर आहे. मात्र, आयपीएल 2026 मधील प्रभावी कामगिरीमुळे भुवनेश्वर पुन्हा चर्चेत आला. तो स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे भारतीय व्हाइट-बॉल संघात त्याच्या पुनरागमनाची मागणीही झाली. आता हाँगकाँग सिक्सेसमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली आहे. भुवनेश्वरसोबत कृणाल पांड्याचाही संघात समावेश आहे. दोघेही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात. त्यांच्यासोबत नितीश राणा, शशांक सिंह, टी. नटराजन, राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया यांचीही निवड झाली आहे.

भारताला 21 वर्षांनंतर विजेतेपदाची प्रतीक्षा 

हाँगकाँग सिक्सेसचे स्वरूप पारंपरिक क्रिकेटपेक्षा वेगळे आहे. प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात आणि सामन्यात प्रत्येकी सहा षटके टाकली जातात. भारताने आतापर्यंत या स्पर्धेचे एकदाच विजेतेपद पटकावले आहे. 2005 मध्ये भारताने ही ट्रॉफी जिंकली होती. 2024 मध्ये स्पर्धेचे पुनरागमन झाल्यानंतर मात्र भारताला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मागील दोन हंगामांत भारत गट फेरीतच बाहेर पडला असून, दहा सामन्यांपैकी नऊ सामने गमावले आहेत. यंदा भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली भारताला हा खराब रेकॉर्ड बदलण्याची संधी असेल.

हाँगकाँग सिक्सेस 2026 साठी भारतीय संघ (Team India squad for Hong Kong Sixes 2026) : 

भुवनेश्वर कुमार (कर्णधार), कृणाल पांड्या, नितीश राणा, शशांक सिंह, टी. नटराजन, राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया.

हे ही वाचा -

क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेलं घडलं; पोलार्डच्या बॅटीला चेंडू न लागताही स्टँडमध्ये, पंचांच्या निर्णयाने सगळे खेळाडू चक्रावले, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th ODI : दोन झेल सोडले अन् टीम इंडियाचं वाटोळं! रोहित-इशानच्या चुकीचा विल यंगने घेतला बदला, सगळ्यांना धू धू धुतलं अन् ठोकलं शतक
दोन झेल सोडले अन् टीम इंडियाचं वाटोळं! रोहित-इशानच्या चुकीचा विल यंगने घेतला बदला, सगळ्यांना धू धू धुतलं अन् ठोकलं शतक
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
IND vs NZ 4th ODI LIVE : एकट्या विल यंगने टीम इंडियाला घाम फोडला! शतक ठोकत न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेलं, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 4th ODI LIVE : एकट्या विल यंगने टीम इंडियाला घाम फोडला! शतक ठोकत न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेलं, जाणून घ्या LIVE अपडेट
Sandpaper Controversy : सँडपेपरचा जुना वाद पुन्हा पेटला! कमिन्सच्या घराबाहेर नेमकं काय घडलं?, पत्नी बेकीसोबतच्या भांडणाचा VIDEO व्हायरल, उस्मान ख्वाजाचं नाव घेत थेट खुलासा
सँडपेपरचा जुना वाद पुन्हा पेटला! कमिन्सच्या घराबाहेर नेमकं काय घडलं?, पत्नी बेकीसोबतच्या भांडणाचा VIDEO व्हायरल, उस्मान ख्वाजाचं नाव घेत थेट खुलासा
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Embed widget