Karnataka High Court Bail RCB Marketing Head Nikhil Sosale : आयपीएल स्पर्धेतील पहिल्या जेतेपदानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी मिरवणुकीच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 चाहत्यांचा मृत्यू झाला.  चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका अधिकाऱ्याला कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला निखिल सोसाळे हा आरसीबीचा मार्केटिंग आणि सेल्स प्रमुख आहे आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा जवळचा आहे. सोसाळे व्यतिरिक्त इतर 3 आरोपींनाही उच्च न्यायालयाने जामिनावर सोडले.  

Continues below advertisement


4 जून रोजी बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबी चाहत्यांचा मोठा जमाव जमला होता, ज्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि या अपघातात 11 चाहत्यांचा मृत्यू झाला, तर सुमारे 50 चाहते जखमी झाले. या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री एम सिद्धरामय्या यांनी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कला दोषी ठरवले आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर 6 जून रोजी पहाटे सोसाळे यांना बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली, तर डीएनए अधिकाऱ्यासह इतर 3 जणांनाही पोलिसांनी अटक केली.


गुरुवारी 12 जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर निकाल दिला आणि सोसाळेसह चारही आरोपींना सशर्त जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. सोसाळे व्यतिरिक्त, डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कचे सुनील मॅथ्यू, किरण कुमार एस आणि शमंथ एनपी माविनाकेरे यांनाही जामिनावर सोडण्यात आले आहे. पण पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत.


या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती एसआर कृष्ण कुमार यांनी हा सुटका आदेश दिला आणि 11 जून रोजी सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांनी आपला निर्णय राखून ठेवला. गुरुवारी त्यांनी जामीन जाहीर केला. चारही आरोपींना त्यांचे पासपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


या प्रकरणात, न्यायालयाने आरसीबी चालवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएनए नेटवर्क यांच्या याचिकेवरही सुनावणी केली, ज्यामध्ये या दोन्ही पक्षांनी चेंगराचेंगरी प्रकरणात त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. 


या प्रकरणात न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, या याचिका कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या याचिकेत विलीन केल्या जातील आणि त्यानंतर सुनावणी होईल. केएससीएनेही त्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती.


हे ही वाचा -


Gautam Gambhir News : गौतम गंभीरच्या कुटुंबावर ओढावलं संकट, आईला हृदयविकाराचा झटका! इंग्लंड दौरा सोडून परतला भारतात