BCCI on Gautam Gambhir Coaching Staff Future : भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संपताच कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे दोन अत्यंत विश्वासू सहकारी रयान टेन डोशेट आणि मोर्ने मोर्कल यांच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआय लवकरच एक महत्त्वाची बैठक घेणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर या दोघांचाही करार संपुष्टात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रयान टेन डोशेट यांचे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे, तर मोर्कल यांच्याबाबत बोर्ड चर्चा करू शकते.

Continues below advertisement

डोशेट आणि मोर्कल यांची विदाई निश्चित?

2024 मध्ये जेव्हा गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली, तेव्हा त्याने रयान टेन डोशेट आणि मोर्ने मोर्कल यांना आपल्या कोचिंग स्टाफमध्ये समाविष्ट करून घेतले होते. हे दोघेही गंभीरसोबत आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा भाग होते. सुरुवातीला अभिषेक नायर हे देखील सहाय्यक प्रशिक्षक म्हणून या संघाशी जोडले गेले होते, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. आता डोशेट आणि मोर्कल हे देखील गंभीरची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रयानने एका आयपीएल फ्रँचायझीसोबत चर्चा सुरू केली आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्कल इतर पर्यायांचा शोध घेत आहे.

Continues below advertisement

टी. दिलीपचाही पत्ता होणार कट? 

भारतीय संघाच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्या जागेवरही टांगती तलवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय भारतीय खेळाडूंच्या सध्याच्या क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीवर अजिबात खूश नाही. टी. दिलीप हे 2021 पासून टीम इंडियासोबत जोडलेले आहेत. अभिषेक नायर यांच्यासोबतच दिलीप यांनाही हटवले जाणार होते, परंतु नंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्या सुट्टीची शक्यता वर्तवली जात आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नवा कोचिंग स्टाफ

इंग्लंड दौरा संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ 23 जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी सेंटर ऑफ एक्सिलेंसचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना 19 जुलै रोजी खेळवला जाईल. खेळाडू आणि मुख्य कोचिंग स्टाफचा वर्कलोड लक्षात घेता, बीसीसीआयने लक्ष्मण यांच्याकडे झिम्बाब्वे दौऱ्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा -

IND Vs ENG 1st ODI Live Streaming : टी-20 च्या पराभवाचा हिशोब चुकता होणार! विराट-बुमराहच्या पुनरागमनाने इंग्लंड थरथरले; कधी अन् कुठे Live सामने बघायचे? जाणून घ्या A टू Z