एक्स्प्लोर

Suryakumar Yadav News : भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?

Shreyas Iyer replaces Suryakumar Yadav as India’s new T20I captain : भारताला विश्वचषक जिंकवून देणारा हा खेळाडू अवघ्या 22 महिन्यांत कर्णधारपदासह संघातील स्थानही गमावेल, अशी कुणालाही अपेक्षा नव्हती.

Shreyas Iyer replaces Suryakumar Yadav as India’s new T20I captain : भारतीय संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जिंकून दिल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचे नाव आघाडीवर होते. मात्र राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनले आणि त्यांनी पहिलाच मोठा निर्णय घेत सूर्यकुमार यादवच्या हाती टी-20 संघाची धुरा सोपवली. त्यामुळे हार्दिक पंड्याला डावलण्यात आले. जुलै 2024 मध्ये सूर्यकुमार यादव भारताचा पूर्णवेळ टी-20 कर्णधार बनला. विशेष म्हणजे, भारताला विश्वचषक जिंकवून देणारा हा खेळाडू अवघ्या 22 महिन्यांत कर्णधारपदासह संघातील स्थानही गमावेल, अशी कुणालाही अपेक्षा नव्हती.

22 महिन्यांत सूर्याचा गेम ओव्हर... (Suryakumar Yadav Dropped From India T20 Team)

बीसीसीआयने 6 जून रोजी श्रेयस अय्यरची भारताच्या टी-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषणा केली. खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 क्रिकेटमध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले. द्विपक्षीय मालिका असो किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धा, भारतीय संघाने सातत्याने यश मिळवले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग नऊ मालिका आणि स्पर्धा जिंकल्या. हा विजयी रथ टी-20 विश्वचषक2026 पर्यंत अविरत सुरू राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताचा विजयाचा टक्का 80.76 इतका राहिला, जो पूर्ण सदस्य देशांच्या कर्णधारांमध्ये सर्वोच्च मानला जातो.

सूर्या बाहेर... अजित आगरकर काय म्हणाले? (Ajit agarkar On Suryakumar Yadav)

कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेल्या सूर्यकुमार यादवची वैयक्तिक फलंदाजी मात्र सातत्याने घसरत गेली. मनगटाच्या दुखापतीच्या समस्येमुळे गेल्या 18 महिन्यांत त्याची बॅट शांत राहिली. त्यावर अजित आगरकर म्हणाले की, "सूर्याबाबत हा निर्णय खरोखरच कठीण होता. नुकताच आपण विश्वचषक जिंकला आहे, पण प्रत्येक विश्वचषकानंतर संघाच्या पुढील वाटचालीचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घ्यावा लागतो. सूर्यकुमार यादवचा वैयक्तिक फॉर्म हा एक मुद्दा होता, पण त्याचबरोबर पुढील दोन वर्षांचा, किंबहुना पुढील विश्वचषकापर्यंतच्या कालावधीचा विचार करून आम्हाला हा निर्णय योग्य वाटला. मी आधीही म्हटल्याप्रमाणे, श्रेयस अय्यर कर्णधारपदासाठी पूर्णपणे पात्र आणि योग्य निवड आहे."

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR IRELAND SERIES)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR England SERIES)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारतीय टी-20 संघ (India Squad for the Asian Games)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा -

India Squad for Asian Games 2026 : टीम इंडियामधून 11 खेळाडू OUT, बीसीसीआयने भाकरी नव्हे अख्खा तवाच फिरवला! एशियन गेम्ससाठी संघ जाहीर; पाहा चक्रावणारा Squad

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
Yashveer Goud : हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? टीम इंडियाच्या यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
Siraj : तिरंग्याचा मान राखण्यासाठी मोहम्मद सिराज धावला, सुरक्षा रक्षकाच्या हातातून तिरंगा खेचला, नेटकऱ्यांकडून सिराजचं कौतुक Video 
तिरंग्याचा अपमान होतोय ते पाहताच सिराजची धाव, सुरक्षारक्षकाच्या हातून राष्ट्रध्वज काढून घेतला, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget