मुंबई: वुमेन्स प्रीमिअर लीगच्या सामन्यांवर महाराष्ट्रातील मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकांच्या मतदानाचा प्रभाव पडणार आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक 15 जानेवारीला होणार आहे. यामुळं  डब्ल्यूपीएलचे दोन सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाऊ शकतात. 14 आणि 15 जानेवारीला होणाऱ्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश न देण्याबाबत बीसीसीआयकडून विचारविनिमय सुरु आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रेक्षकांशिवाय मॅचेस आयोजित करण्यासंदर्भातील शक्यतांवर भाष्य केलं.  

Continues below advertisement

देवजीत सैकिया यांनी आयएएनएस सोबत या संदर्भात संवाद साधला. 15 जानेवारीला मुंबई महापालिकेसाठी मतदान होणार आहे. याबाबत सैकिया पुढं म्हणाले की आम्ही विचार करतोय मॅच खेळवल्या जाव्यात, मात्र प्रेक्षकांना प्रवेश देऊ नये. आम्ही याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मॅच सुरु राहतील, मात्र प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याचा मुद्दा आहे, कारण मुंबई पोलिसांनी सांगितल्यानुसार ते 14 आणि 15 जानेवारीला सुरक्षा देऊ शकणार नाहीत, असं देवजीत सैकिया म्हणाले.  

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी होईल. बीसीसीआयनं 16 तारखेसंदर्भात चिंता व्यक्त केलेली नाही.देवजीत सैकिया यांनी 14 आणि 15 जानेवारीला मोकळ्या मैदानात प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले जाऊ शकतात, असं म्हटलं. 

Continues below advertisement

WPL 2026 चं वेळापत्रक

WPL 2026 चे 17  जानेवारीपर्यंतचे सर्व सामने नवी मुंबईत खेळवले जाणार आहेत. 14 जानेवारीला दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात सामना होणार आहे. तर, 15 जानेवारीला यूपी वॉरिअर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होईल. 

दरम्यान, डब्ल्यूपीएलमध्ये गुजरात जायंटस दोन विजयासह पहिल्या स्थानावर आहे. तर, दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आहे. तर, तिसऱ्या स्थानावर आरसीबी आहे.