एक्स्प्लोर

Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत 'No Bumrah', भारतीयांना झटका, पण बीसीसीआयचं अजब विधान, म्हणाले, काहीच फरक पडत नाही!

Devajit Saikia on Jasprit Bumrah : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही.

Team India Champions Trophy : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जस्सीच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडिया थोडी कमकुवत दिसत आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर जसप्रीत बुमराहला पाच आठवडे विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते, जिथे तो दुखापतग्रस्त झाला होता आणि दुसऱ्या डावात गोलंदाजी करायला आला नव्हता. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी म्हटले आहे की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.

बुमराहच्या अनुपस्थितीमुळे काही फरक पडणार नाही!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वोत्तम संघ निवडण्यासाठी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी अजित आगरकर यांना जबाबदारी दिली. बुमराहच्या जागी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे, तर वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्यासह वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. 

देवजीत सैकिया म्हणाले, 'आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वोत्तम संघ निवडला आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही ट्रॉफी जिंकू. भारताकडे इतकी मोठी बेंच स्ट्रेंथ आहे आणि मला वाटत नाही की जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे संघ कॉम्बिनेशनवर कोणताही मोठा परिणाम होईल.

वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फॉर्मबद्दल बोलताना, बीसीसीआयच्या सचिवांनी स्पर्धेत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर विश्वास व्यक्त केला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहितने शतक झळकावले तर कोहलीने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून आपला दुष्काळ संपवला आणि यजमान संघाने मालिका 3-0 अशी जिंकली. यापूर्वी, सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली होती.

शेवटच्या क्षणी वरुणची एन्ट्री!

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शेवटच्या क्षणी त्यांच्या संघात बदल केले आहेत. बुमराहला बाहेर केल्यानंतर हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, या स्पर्धेसाठी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. वरुणला संघात प्रवेश मिळाल्यानंतर यशस्वी जैस्वालला मुख्य संघातून वगळण्यात आले आहे. 

टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, संघाचा पुढील सामना 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी होईल. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात रोहितचा संघ 2 मार्च रोजी न्यूझीलंडशी सामना करताना दिसेल. अलिकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा पराभव केला, त्यानंतर संघाचे मनोबल उंचावले आहे.

हे ही वाचा - 

PAK vs NZ : काळी मांजर मैदानातून गेली अन्... चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तोंडघशी पडला पाकिस्तान! न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, बांगलादेशला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश 
मोठी बातमी! भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, बांगलादेशला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश 
IPL 2027 : MS धोनी 2027 ची आयपीएल खेळणार की नाही? CSK च्या खेळाडूनं दिली महत्वाची माहिती
MS धोनी 2027 ची आयपीएल खेळणार की नाही? CSK च्या खेळाडूनं दिली महत्वाची माहिती
Vaibhav Sooryavanshi : अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने डोक लावलं, ईशान किशनने DRS घेतला आणि विकेट मिळाली; सगळे हैराण, पाहा VIDEO
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने डोक लावलं, ईशान किशनने DRS घेतला आणि विकेट मिळाली; सगळे हैराण, पाहा VIDEO
ENG vs PAK 3rd Test : नाचता येईना, अंगण वाकडं... भारताचं नाव घेत पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक दावा, इंग्लंड टीमला नको नको ते बोलला
नाचता येईना, अंगण वाकडं... भारताचं नाव घेत पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक दावा, इंग्लंड टीमला नको नको ते बोलला

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Breaking Live News Updates: दिल्लीत 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Breaking Live News Updates: दिल्लीत 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
Embed widget