नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुवाहाटीमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये भारतानं 8 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. भारतानं सलग तिसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकली आहे. आता बीसीसीआयनं राहिलेल्या दोन टी 20 सामन्यांसाठी अपडेट संघ जाहीर केला आहे. यानुसार तिलक वर्मा चौथ्या आणि पाचव्या टी 20 साठी उपलब्ध नाही. यामुळं बीसीसीआयनं श्रेयस अय्यरला संघात स्थान दिलं आहे. तिलक वर्मा जरी दोन टी 20 सामने खेळणार नसला तरी त्यानं ट्रेनिंग सुरु केली असल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे.  

Continues below advertisement

बीसीसीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्ररानुसार तिलक वर्मानं ट्रेनिंग सुरु केलं आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅबिलिटेशनमध्ये तिलक वर्माच्या फिटनेसमध्ये सुधारणा दिसून येत आहेत. मात्र, मॅचसाठी फिट होण्यासाठी अजून वेळ लागार आहे. यामुळं तिलक वर्मा शेवटच्या दोन टी 20 सामन्यांसाठी उपलब्ध नाही.  

बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकातून हे स्पष्ट होतं की तिलक वर्मा वेगानं फिट होत आहे. टी 20 वर्ल्ड कप पूर्वी तो संघासोबत जोडला जाईल. म्हणजेच, तिलक वर्मा स्पर्धेबाहेर जाणार नाही.  

Continues below advertisement

बीसीसीआयनं म्हटलं की तिलक वर्मा 3 फेब्रुवारीला पूर्णपणे फिट होऊन मुंबईत संघासोबत असेल. भारत 4 फेब्रुवारीला ब्रेबॉर्नवर सराव सामना खेळणार आहे.  

बीसीसीआयनं राहिलेल्या दोन टी 20 सामन्यांसाठी श्रेयस अय्यरला रिप्लेसमेंट म्हणून संघात कायम ठेवलं आहे. मात्र, पहिल्या तीन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरला टी 20 सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. भारतानं या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.  

 

आगामी टी 20 वर्ल्ड कप पूर्वी भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे कॅप्टन सूर्यकुमार यादव पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे. सूर्यकुमार यादवनं दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात  अर्धशतक झळकावलं आहे. 

दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं खेळलेल्या सर्व टी 20 मालिका जिंकल्या आहेत. भारतानं न्यूझीलंड विरुद्धचे पहिले तीन टी 20 सामने जिंकले आहेत. आता चौथा टी 20 सामना  28 जानेवारी रोजी होणार आहेत. तर पाचवा टी 20 सामना 31 जानेवारीला होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप पूर्वीची ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.  भारताचा संघ :  सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उप-कर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (विकेटकीपर), रवि बिश्नोई.