Team India Victory Parade In Mumbai: भारताच्या ऐतिहासिक टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) विजयानंतर क्रिकेट चाहते टीम इंडियाच्या भव्य विजय परेडची आतुरतेने वाट (Team India Victory Parade) पाहत आहेत. बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे वेळापत्रक जाहीर केलेले नसले तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्ववेजेत्या टीम इंडियासाठी एक भव्य रोड शो आयोजित करण्याचा प्लॅन तयार केला जात आहे.
टीम इंडियाचे सर्व खेळाडू पहिले नवी दिल्लीत येऊ शकतात. टीम इंडियातील खेळाडू दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. यानंतर सर्व खेळाडू दिल्लीहून मुंबईत दाखल होतील. मुंबईत 11 किंवा 12 मार्चला विश्वविजेत्या टीम इंडियाचा भव्य रोड शो आयोजित केला जाऊ शकतो. वानखेडे स्टेडियमवर या विजयी रोड शोच्या समारोप होण्याची अपेक्षा आहे, जिथे एक भव्य समारंभ आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात बीसीसीआयकडून संपूर्ण टीम इंडियाला बक्षीस दिले जाईल. (Team India Victory Parade In Mumbai)
2007 आणि 2024 रोजी विश्वविषक जिंकल्यानंतरही मुंबईत निघालेला टीम इंडियाचा रोड शो- (Team India Victory Parade In Mumbai)
मुंबईतील ही टीम इंडियाची विजयी परेड 2007 आणि 2024 च्या आठवणींना उजाळा देऊ शकते. खेळाडूंचा रोड शो नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन-बसमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. गेल्या वर्षी मरीन ड्राइव्हवर जमलेल्या प्रचंड गर्दीला लक्षात घेऊन, मुंबई पोलीस आणि प्रशासन चाहत्यांना सुरक्षितपणे उत्सव साजरा करता यावा, यासाठी गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष सुरक्षा योजना तयार करत आहे.
टीम इंडियाचं जोरदार सेलिब्रेशन (Team India Celebration T20 WC 2026)
न्यूझीलंडला पराभूत करुन पुन्हा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. भारतीय संघातील खेळाडूंचे कुटुंबीय देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. भारताने सलामीच्या फलंदाजांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली होती.भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावांत कोलमडला. भारताकडून जसप्रीत बुमरानं चार, तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.
