BCCI Central Contract 2025 List: बीसीसीआयने 2024-25 हंगामासाठी (1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025) वार्षिक करार जाहीर (BCCI Central Contract) केला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे.
श्रेयस अय्यरला बी प्लस श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. तसेच ईशान किशनचा समावेश सी श्रेणीत करण्यात आला आहे. याआधी बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांना अजूनही त्याच श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
ऋषफ पंतचं प्रमोशन-
ऋषभ पंत हळूहळू टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. 2023-24 हंगामाच्या यादीत पंतचा बी श्रेणीत समावेश होता. परंतु यंदा बीसीसीआयने ऋषभ पंतचा समावेश ए श्रेणीत केला आहे. त्यामुळे ऋषभ पंतला आता वर्षाला 5 कोटी रुपये पगार मिळेल.
8 खेळाडूंचा केंद्रीय करारच्या यादीत समावेश-
बीसीसीआयने हर्षित राणा, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासह 8 खेळाडूंना केंद्रीय करार यादीत समाविष्ट केले आहे. मात्र शार्दुल ठाकूर, जितेश शर्मा, केएस भरत आणि आवेश खान यांना केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे. 2023-24 हंगामाच्या यादीत या चार खेळाडूंना सी श्रेणीत समावेश करण्यात आला होता.
कोणाला किती कोटी रुपये मिळणार?
'ए प्लस'- (वार्षिक 7 कोटी) : रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह.
'ए'- (वार्षिक 5 कोटी) : मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
'ब'- (वार्षिक 1 कोटी) : सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर.
'क'- (वार्षिक 1 कोटी) : रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराझ खान, नितीशकुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.