एक्स्प्लोर

Why BCCI Ban Rohit Yadav : BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?

Why BCCI Ban Rohit Yadav : भारतीय क्रिकेटमध्ये वयाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Why BCCI Ban Rohit Yadav : भारतीय क्रिकेटमध्ये वयाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय अंडर-19 संघाचा लेगस्पिनर रोहित यादव याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तब्बल दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रोहित यादवची ऑस्ट्रेलियाविरुद्ध या महिन्यात होणाऱ्या अंडर-19 वनडे आणि मल्टी-डे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, त्याच्या वयाबाबतचा घोटाळा समोर आल्यानंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या प्री-सीझन डॉक्युमेंट तपासणीदरम्यान ही बाब उघडकीस आली.

कागदपत्रांमध्ये तब्बल 27 महिन्यांचा फरक

रोहित यादवने बंगालकडून वयोगटातील क्रिकेट खेळले आहे. CABच्या तपासणीत त्याच्या कागदपत्रांमध्ये 27 महिन्यांचा वयातील फरक आढळला. त्यानंतर ही माहिती बीसीसीआय आणि त्याच्याशी संलग्न सर्व राज्य क्रिकेट संघटनांना देण्यात आली. बीसीसीआयने रोहितवरील बंदी तात्काळ प्रभावाने लागू केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वीच त्याच्या अंडर-19 कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे.

भारतासाठी तीन अंडर-19 सामने

रोहित यादवने याच वर्षी जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध एक युवा कसोटी आणि दोन वनडे सामने खेळले. या तीन सामन्यांमध्ये त्याने एकूण 7 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याच्यावर विश्वास दाखवण्यात आला होता. मात्र, वयाबाबतच्या कागदपत्रांमधील विसंगतीमुळे त्याचे संघातील स्थान गेले आणि आता त्याच्यावर दोन वर्षांची बंदीही घालण्यात आली आहे.

अंडर-19 विश्वविजेत्या खेळाडूवरही कारवाई

रोहित यादवसोबतच बंगाल क्रिकेटमध्ये वयाच्या कागदपत्रांशी संबंधित प्रकरणांमध्ये 64 इतर खेळाडूंवरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 2022 साली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा भाग असलेल्या रवि कुमार याचाही समावेश आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज रवि कुमारने 2022 अंडर-19 विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत सहा सामने खेळताना 10 विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तर रवि कुमारने भेदक गोलंदाजी केली. त्याने 9 षटकांत 34 धावा देत 4 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.

हे ही वाचा -

India vs Japan T20 Match : आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार सामना? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 1st T20 LIVE Streaming : हॉटस्टार की सोनीलिव्ह... भारत-वेस्ट इंडिजचा पहिला टी-20 सामना फ्री मध्ये कुठे पाहायचा? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
हॉटस्टार की सोनीलिव्ह... भारत-वेस्ट इंडिजचा पहिला टी-20 सामना फ्री मध्ये कुठे पाहायचा? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
Harmanpreet Kaur News : वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story
वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story
Harmanpreet Kaur Marathi News: हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावूक पोस्ट करत म्हणाली, मला अनेकदा वैयक्तिक पातळीवर किंमत चुकवावी लागली!
हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावूक पोस्ट करत म्हणाली, मला अनेकदा वैयक्तिक पातळीवर किंमत चुकवावी लागली!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Embed widget