India ODI squad for England Tour Announced : इंग्लंडविरुद्ध आगामी काळात होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी 21 जून रोजी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, या निवडीत एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला असून, आदल्याच दिवशी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

Continues below advertisement

विराट कोहली आणि बुमराहचे पुनरागमन

माजी कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले असले, तरी तो सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याची निवड फिटनेस क्लिअरन्सच्या अधीन आहे. म्हणजेच फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्याला खेळण्याची संधी मिळेल. विराटच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळालेल्या यशस्वी जैस्वालने 20 जून रोजी चेन्नई येथे नाबाद 110 धावांची खेळी केली होती. मात्र, विराट परत आल्यामुळे त्याला संघातून स्थान गमवावे लागले आहे.

Continues below advertisement

दुसरीकडे, 2023 च्या विश्वचषक फायनलनंतर जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच वनडे संघात परतला आहे. तसेच, अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचेही संघात पुनरागमन झाले असून यशस्वी जयस्वाल, प्रिन्स यादव आणि हर्ष दुबे यांना संघात स्थान मिळालेले नाही.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय वनडे संघ (India ODI squad for England Tour) : 

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार.

वरुण चक्रवर्ती आयर्लंड दौऱ्यातून बाहेर 

दुसऱ्या बाजूला, भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये त्याचे पुनर्वसन पूर्ण करू शकलेला नाही. भारत आणि आयर्लंड दरम्यान 26 आणि 28 जून रोजी दोन टी-20 सामने होणार आहेत.

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

1 जुलै: पहिला टी-20 सामना, चेस्टर-ले-स्ट्रीट4 जुलै: दुसरा टी-20 सामना, मँचेस्टर7 जुलै: तिसरा टी-20 सामना, नॉटिंगहॅम9 जुलै: चौथा टी-20 सामना, ब्रिस्टल11 जुलै: पाचवा टी-20 सामना, साउथहॅम्प्टन14 जुलै: पहिला एकदिवसीय सामना, बर्मिंगहॅम16 जुलै: दुसरा एकदिवसीय सामना, कार्डिफ19 जुलै: तिसरा एकदिवसीय सामना, लॉर्ड्स

हे ही वाचा -

IND A vs SL A Final : हे काय IPL नाही... म्हणणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना वैभवने दाखवले भरदिवसा तारे, कायमची बोलती केली बंद, नेमकं काय घडलं?