India U19 World Cup Winning : ICCने रिकाम्या हाताने पाठवलं, BCCIने उघडली तिजोरी; आयुष म्हात्रेच्या युवा टीमला 7.5 कोटींचे बक्षीस जाहीर
BCCI Announces Cash Prize India U19 World Cup Winning : अंडर-19 क्रिकेटमधील जगातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताने पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान पटकावला आहे.

BCCI Announces Cash Prize India U19 World Cup Winning : अंडर-19 क्रिकेटमधील जगातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताने पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान पटकावला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेमध्ये पार पडलेला अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकत इतिहास रचला. या विजयासह टीम इंडियाने विक्रमी सहाव्यांदा हे जेतेपद आपल्या नावावर कोरले. वैभव सूर्यवंशीसह भारतीय युवा खेळाडूंच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपला दिलदारपणा दाखवत मोठ्या बक्षीसांची घोषणा केली आहे. बसीसीआयकडून संपूर्ण संघाला 7.5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
The BCCI Honorary Secretary, Mr Devajit Saikia (@lonsaikia), announces a cash award of ₹7.5 crore for the victorious India U19 team, along with the coaching and support staff and the Junior Cricket Committee, following their glorious unbeaten campaign that culminated in India’s… pic.twitter.com/kbZRBW3oat
— BCCI (@BCCI) February 7, 2026
ICCने रिकाम्या हाताने पाठवलं...
हरारे येथे शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या आयसीसी मेंस अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक उंचावला. विशेष म्हणजे, भारताचे मागील जेतेपदही 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच जिंकले होते. मात्र, या मोठ्या यशानंतरही आयसीसीकडून भारतीय संघाला कोणतेही आर्थिक बक्षीस मिळाले नाही. खेळाडू फक्त पदकांसह मायदेशी परतले. कारण अंडर-19 वर्ल्ड कप हा युवा खेळाडूंच्या विकासासाठीचा स्पर्धा मंच मानला जातो आणि त्यामुळे आयसीसी या स्तरावर कोणतेही रोख बक्षीस देत नाही.
📸 📸
— BCCI (@BCCI) February 6, 2026
Moments they will never forget! 🙌
Let the celebrations begin 🇮🇳#U19WorldCup pic.twitter.com/wGpdChSbWW
बीसीसीआयने उघडली तिजोरी
आयसीसीने आपल्या धोरणानुसार आर्थिक बक्षीस दिले नसले, तरी बीसीसीआयने आपल्या परंपरेनुसार विजेत्या संघाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. अंतिम विजयाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवार 7 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या यशाला संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत 7.5 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.
विशेष बाब म्हणजे, अंडर-19 स्तरावर बीसीसीआयकडून देण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बक्षीस आहे. यापूर्वी 2025 मध्ये अंडर-19 महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून 5 कोटी रुपये देण्यात आले होते.
वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकामुळे भारत ठरला चॅम्पियन
14 वर्षांचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीमुळे अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 411 धावांचा डोंगर उभारला. संपूर्ण स्पर्धेत तीन वेळा शतकाच्या उंबरठ्यावर थांबलेला वैभव, अंतिम सामन्यात मात्र अक्षरशः तुटून पडला. वैभवने केवळ 80 चेंडूमध्ये 175 धावांची ऐतिहासिक आणि विक्रमी खेळी साकारली. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 15 षटकार लगावत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. इंग्लंडसाठी 412 धावांचे लक्ष्य आवाक्याबाहेर ठरले आणि कॅलेब फॉल्कनरच्या शतकानंतरही इंग्लंडचा संघ 311 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या दमदार कामगिरीसाठी वैभव सूर्यवंशीला प्लेअर ऑफ द मॅच तसेच संपूर्ण स्पर्धीत 439 धावा केल्याबद्दल प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा -





















