BBL 2026-27 Schedule Marathi News : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा (BBL) 16 वा सीझन लवकरच धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज, 14 जुलै रोजी बीबीएलकडून आगामी 2026-27 च्या हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यंदाच्या हंगामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या लीगचा सलामीचा सामना भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरून (MCG) याची घोषणा केली होती. यानुसार, बीबीएलचा पहिला थरारक सामना चेन्नईच्या ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) 12 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

Continues below advertisement

12 डिसेंबरपासून BBL 2026-27 चा थरार

बिग बॅश लीग 2026-27 ची सुरुवात 12 डिसेंबरपासून होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात हा सलामीचा सामना रंगेल. या ऐतिहासिक सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाला होम टीमचा दर्जा देण्यात आला आहे. भारतात पहिल्यांदाच बीबीएलचा सामना आयोजित केला जात असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

पंतप्रधानांनी मेलबर्नमध्ये केली होती घोषणा

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (MCG) भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज, माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आणि माजी महिला क्रिकेटपटू लिसा स्थालेकर उपस्थित होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत क्रिकेट संबंधांचे प्रतीक म्हणून या सामन्याकडे पाहिले जात आहे.

BBL 2026-27 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे -

तारीखसामना (Match)वेळ (IST)
१२ डिसेंबरमेलबर्न रेनेगेड्स vs पर्थ स्कॉर्चर्स (चेन्नई)दुपारी २:४०
१५ डिसेंबरब्रिस्बेन हीट vs सिडनी सिक्सर्सदुपारी १:४५
१६ डिसेंबरसिडनी थंडर vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्सदुपारी १:४५
१७ डिसेंबरहोबार्ट हरिकेन्स vs ब्रिस्बेन हीटदुपारी १:४५
१८ डिसेंबरमेलबर्न स्टार्स vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्सदुपारी १:४५
१९ डिसेंबरसिडनी थंडर vs सिडनी सिक्सर्सदुपारी १:४५
२० डिसेंबरपर्थ स्कॉर्चर्स vs होबार्ट हरिकेन्सदुपारी १:४५
२१ डिसेंबरमेलबर्न स्टार्स vs ब्रिस्बेन हीटदुपारी १:४५
२२ डिसेंबरसिडनी सिक्सर्स vs मेलबर्न रेनेगेड्सदुपारी १:४५
२३ डिसेंबरअ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs सिडनी थंडरदुपारी १:४५
२४ डिसेंबरमेलबर्न रेनेगेड्स vs होबार्ट हरिकेन्सदुपारी १:४५
२६ डिसेंबरसिडनी सिक्सर्स vs ब्रिस्बेन हीटदुपारी १२:३५
२६ डिसेंबरपर्थ स्कॉर्चर्स vs मेलबर्न स्टार्सदुपारी ३:४५
२७ डिसेंबरसिडनी थंडर vs मेलबर्न रेनेगेड्सदुपारी १:४५
२८ डिसेंबरब्रिस्बेन हीट vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्सदुपारी १:४५
२९ डिसेंबरहोबार्ट हरिकेन्स vs मेलबर्न स्टार्सदुपारी १:४५
३० डिसेंबरपर्थ स्कॉर्चर्स vs सिडनी थंडरदुपारी १:४५
३१ डिसेंबरअ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs मेलबर्न स्टार्सदुपारी १:४५
१ जानेवारीमेलबर्न रेनेगेड्स vs सिडनी सिक्सर्ससकाळी १०:३०
१ जानेवारीब्रिस्बेन हीट vs होबार्ट हरिकेन्सदुपारी १:४५
२ जानेवारीसिडनी थंडर vs पर्थ स्कॉर्चर्सदुपारी १:४५
३ जानेवारीसिडनी सिक्सर्स vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्सदुपारी १:४५
४ जानेवारीमेलबर्न स्टार्स vs मेलबर्न रेनेगेड्सदुपारी १२:३५
४ जानेवारीपर्थ स्कॉर्चर्स vs ब्रिस्बेन हीटदुपारी ३:४५
५ जानेवारीहोबार्ट हरिकेन्स vs सिडनी थंडरदुपारी १:४५
६ जानेवारीअ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs मेलबर्न रेनेगेड्सदुपारी १:४५
७ जानेवारीमेलबर्न स्टार्स vs सिडनी सिक्सर्सदुपारी १:४५
८ जानेवारीब्रिस्बेन हीट vs पर्थ स्कॉर्चर्सदुपारी १:४५
९ जानेवारीहोबार्ट हरिकेन्स vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्सदुपारी १:४५
१० जानेवारीसिडनी सिक्सर्स vs पर्थ स्कॉर्चर्ससकाळी ८:४०
१० जानेवारीमेलबर्न रेनेगेड्स vs ब्रिस्बेन हीटदुपारी १:४५
११ जानेवारीसिडनी थंडर vs मेलबर्न स्टार्सदुपारी १:४५
१२ जानेवारीअ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs होबार्ट हरिकेन्सदुपारी १:४५
१३ जानेवारीपर्थ स्कॉर्चर्स vs मेलबर्न रेनेगेड्सदुपारी १:४५
१४ जानेवारीमेलबर्न स्टार्स vs होबार्ट हरिकेन्सदुपारी १:४५
१५ जानेवारीसिडनी सिक्सर्स vs सिडनी थंडरदुपारी १:४५
१६ जानेवारीअ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs पर्थ स्कॉर्चर्ससकाळी १०:३०
१६ जानेवारीमेलबर्न रेनेगेड्स vs मेलबर्न स्टार्सदुपारी १:४५
१७ जानेवारीहोबार्ट हरिकेन्स vs सिडनी सिक्सर्ससकाळी ८:१०
१७ जानेवारीब्रिस्बेन हीट vs सिडनी थंडरदुपारी १:४५

हे ही वाचा -

FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्वाला हादरवणारा सलग दुसरा मृत्यू! आधी 25 वर्षांचा स्टार गेला, आता FIFA विश्वचषकातून हकालपट्टी झालेल्या रेफरीचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?