Bangladesh Reaction ICC T20 World Cup Venue : बांगलादेश क्रिकेटने (Bangladesh) आयसीसीला (ICC) पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी मनवण्याचा निर्धार केला आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 संदर्भात बांग्लादेशची भूमिका अधिक ठाम केली आहे. बांग्लादेशचे क्रीडा सल्लागार डॉ. आसिफ नजरूल यांनी स्पष्ट केलं आहे की, हा प्रश्न केवळ खेळाडूंच्या सुरक्षेपुरता मर्यादित नाही, तर देशाच्या सन्मानाशीही जोडलेला आहे. त्यामुळेच त्यांनी बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेतच खेळवावेत, जी विनंती आयसीसीने फेटाळून लावली होती.
हा फक्त सुरक्षेचा नाही, तर देशाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा
डॉ. आसिफ नजरूल म्हणाले की, आयसीसीकडून आलेलं उत्तर वाचल्यानंतर असं वाटलं की भारतीय (India) भूमीवर बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबतची परिस्थिती त्यांना नीट समजलेली नाही. “हा केवळ सुरक्षेचा विषय नाही, तर देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. भारताने बांगलादेशचा अपमान केला आहे. आम्ही अजूनही याकडे फक्त सुरक्षा म्हणून पाहत नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
ICC ने आधीच फेटाळली होती मागणी (ICC Rejected Bangladesh Request)
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या (ICC T20 World Cup News) अधिकृत वेळापत्रकानुसार, बांग्लादेशला गट टप्प्यातील चार सामने भारतातील कोलकाता आणि मुंबई येथे खेळायचे आहेत. मात्र, आयपीएलमधून मुस्तफिजुर रहमानला बाहेर काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला ईमेल करून हे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती. आयसीसीने ही मागणी नाकारत, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सामने खेळावे लागतील, असं स्पष्ट केलं.
तरीही ICC ला मनवण्यावर बांगलादेश ठाम
आयसीसीचा नकार असूनही बांगलादेश माघार घेण्याच्या मनःस्थितीत नाही. डॉ. आसिफ नजरूल यांनी सांगितलं की, या मुद्द्यावर कोणताही तडजोडीचा विचार नाही. “हा प्रश्न खेळाडूंच्या सुरक्षेचा, बांगलादेशच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या सन्मानाचा आहे. आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, वर्ल्ड कप खेळायचा आहे, पण भारतात नाही. आम्हाला श्रीलंकेतच खेळायचं आहे, कारण तेही या स्पर्धेचं अधिकृत वेन्यू आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तसंच, “या विषयावर आम्ही अजूनही ठाम आहोत आणि आयसीसीला आमची भूमिका समजावून सांगण्यात आम्ही यशस्वी होऊ,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा -