Babar Azam PAK vs NED : दुबळ्या संघानेही बाबर आझमला स्वस्तात गुंडाळलं! 18 चेंडूत फक्त 15 धावा… आता भारतासमोर पाकिस्तानचं काय होणार?, कॅम्पमध्ये खळबळ
Pakistan T20 World Cup 2026 : पाकिस्तानने टी-20 वर्ल्डकप 2026 ची सुरुवात विजयाने केली असली, तरी हा विजय अक्षरशः पराभवाच्या दारातून परत आणलेला ठरला.

Pakistan Beat Netherlands T20 World Cup 2026 : पाकिस्तानने टी-20 वर्ल्डकप 2026 ची सुरुवात विजयाने केली असली, तरी हा विजय अक्षरशः पराभवाच्या दारातून परत आणलेला ठरला. कोलंबो येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा 3 विकेट्सनी पराभव केला. नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना 147 धावा केल्या. ही धावसंख्या मोठी वाटत नसली, तरी पाकिस्तानला हे लक्ष्य गाठताना अक्षरशः घाम फुटला.
Babar Azam after scoring 15 runs in worldcup’s first match😂🤣#T20WorldCup
— Sarcasm (@sarcastic_us) February 7, 2026
pic.twitter.com/3p3Os1j2zc
नेदरलँड्सची झुंजार फलंदाजी
नेदरलँड्सकडून कुणीही मोठी खेळी केली नाही, पण कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (37) आणि बास डी लीड (30) यांनी संघाला सावरले. त्यांना मायकेल लेविट (24) आणि कॉलिन अॅकरमन (20) यांची साथ मिळाली. या योगदानाच्या जोरावर नेदरलँड्सचा संघ 147 धावांपर्यंत मजल मारू शकला.
पाकिस्तानची चांगली सुरुवात, नंतर धक्क्यावर धक्के...
148 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला सलामीवीर साहिबजादा फरहान (47) आणि सॅम अयूब (13) यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र कर्णधार सलमान आगा केवळ 12 धावा करून माघारी परतले.
What Attitude and what performance!#PAKvsNED #T20WorldCup pic.twitter.com/pxISG5267h
— Ankur Bakhshi (@AnkurBakhshi) February 7, 2026
बाबर आझम पुन्हा अपयशी
पाकिस्तानचा सुपरस्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 18 चेंडूत फक्त 15 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर आधीच टीकेचा धनी ठरलेला बाबर या सामन्यातही आत्मविश्वासात दिसला नाही. दुबळ्या संघासमोर बाबर स्वस्तात आऊट झाला, त्यानंतर बाबरबद्दलचे मीम्स व्हायरल होत आहेत. या मीममध्ये, मेमरने जय शाहवर एक मीम बनवला आहे आणि पाकिस्तानला सांगितले आहे की, 'जर नेदरलँड्सविरुद्ध ही परिस्थिती असेल तर भारताविरुद्ध कशी असेल?'
Netherlands ke khilaaf ye haal hai, to India ke khilaaf kaisa hoga.#PAKvsNED | #T20WorldCup pic.twitter.com/MZJBEZCRqs
— Sagar (@sagarcasm) February 7, 2026
नेदरलँड्सचा जोरदार प्रतिकार...
एकवेळी पाकिस्तानची धावसंख्या 2 विकेट्सला 98 अशी होती आणि उर्वरित 58 चेंडूत फक्त 50 धावा करायच्या होत्या. पण इथून सामन्याने वेगळेच वळण घेतले. 100 धावांपर्यंत पोहोचेपर्यंत पाकिस्तानची अर्धी टीम तंबूत परतली. मोहम्मद नवाज आणि शादाब खान हे अनुभवी अष्टपैलूही अपयशी ठरले. 114 धावांवर पाकिस्तानचे 7 फलंदाज बाद झाले होते आणि नेदरलँड्स विजयाच्या उंबरठ्यावर होते.
फहीम अशरफचा थरार
अखेर फहीम अशरफने सामन्याचा चेहरामोहरा बदलला. त्याने 11 चेंडूत 29 धावांची तुफानी खेळी करत 19व्या षटकात 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला. याच खेळीमुळे पाकिस्तान मोठ्या उलटफेरापासून वाचला. 20व्या षटकात लक्ष्य गाठत पाकिस्तानने सामना जिंकला आणि वर्ल्ड कप मोहिमेची विजयी सुरुवात केली.
हे ही वाचा -





















