Desert Vipers vs Dubai Capitals ILT20 Final : जगभरात टी-20 लीग आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान, दुबईतील सर्वात मोठी टी-20 लीग ILT20 खेळली गेली. जिथे डेझर्ट वायपर्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. दुबई कॅपिटल्स संघाने हा सामना जिंकला आणि डेझर्ट व्हायपर्सचा 4 गडी राखून पराभव केला. ILT20 2025 च्या अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तानी आझम खानच्या एका चुकीमुळे डेझर्ट वायपर्स संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

अंतिम सामन्यात डेझर्ट वायपर्सने दुबई कॅपिटल्ससमोर 20 षटकांत 190 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. याचा पाठलाग करताना कॅपिटल्स संघाने 4.5 षटकांत फक्त 31 धावांत 3 गडी गमावले. येथून असे वाटत होते की, लीगच्या चालू हंगामातील टेबल टॉपर म्हणजेच डेझर्ट वायपर्सचा विजय निश्चित आहे आणि ते हा सामना अगदी सहज जिंकतील. पण दुबई कॅपिटल्सच्या डावाच्या आठव्या षटकात आझम खानने विकेटमागे मोठी चूक केली.

झाले असे की, दुबई कॅपिटल्सच्या डावाच्या आठव्या षटकात नाथन स्वेटरच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक आझम खानने स्फोटक फलंदाज रोवमन पॉवेलला यष्टीचीत केले. सर्वांना वाटले होते की, रोवमन पॉवेलचा खेळ संपला आहे आणि तो 7 चेंडूत फक्त 2 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतेल, पण नंतर तिसऱ्या पंचांनी आझमची मोठी चूक पकडली.

खरं तर, आझम खानने रोव्हमन पॉवेलला लवकर बाद करण्याच्या नादात यष्टीच्या समोर हात घेऊन चेंडू पकडला. जे क्रिकेटच्या नियमांनुसार योग्य नाही. अशा परिस्थितीत रोवमन पॉवेलला जीवनदान मिळाले. आझमच्या चुकीमुळे, ज्या चेंडूवर संघाला विकेट मिळाली असती तो चेंडू नो बॉल घोषित करण्यात आला आणि पॉवेलने भेट म्हणून मिळालेल्या फ्री हिटवर एक मोठा षटकार मारला. यानंतर, त्याने एकूण 38 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकार आणि 3 षटकार मारत 63 धावा केल्या, आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची खेळी केली. अंतिम सामन्यात त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले

क्रिकेटचा नियम काय सांगतो?

क्रिकेटच्या नियमांनुसार, विकेटकीपरचे ग्लोव्हज विकेटच्या बरोबर किंवा समोर असतील तर तो नो-बॉल असतो. आणि या व्हिडिओमध्ये आझम खान पुढे आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आणि म्हणूनच तिसऱ्या पंचांनी तो नो-बॉल घोषित केला.

हे ही वाचा -

Shardul Thakur Ranji Trophy : W,W,W,W,W,W.... मुंबईचा 'लॉर्ड' ठाकूर रणजीत घालतोय धुमाकूळ! विकेट्सचा मारला 'षटकार', BCCI देणार संधी?