Australia vs South Africa 1st Test : एकीकडे भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर असून दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळला गेलेला सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत 6 गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात नॅथन लायन आणि स्टार्कने प्रत्येकी 3-3 बळी घेतले. त्याचवेळी दुसऱ्या डावात कर्णधार पॅट कमिन्सने 5 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 99 धावांत सर्वबाद केलं. विशेष म्हणजे भारतानंही बांगलादेशवर विजय मिळवला असून दक्षिण आफ्रिकेच्या या मोठ्या पराभवामुळे भारताला कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Points Table) फायदा झाला आहे. भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी अत्यंत खराब झाली. ज्यामुळे त्यांनी सामना केवळ दोन दिवसांत गमावला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 152 धावा केल्या होत्या. यादरम्यान काईल व्हेरेनने 64 धावांची एकहाती झुंज दिली. यादरम्यान लायन आणि स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी भेदक गोलंदाजी केली. स्टार्कने 14 षटकात 41 धावा देत 3 बळी घेतले. लायनने 8 षटकांत 14 धावांत 3 बळी घेतले. तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्यांनी 218 धावा केल्या. यादरम्यान ट्रॅव्हिस हेडने 92 धावांची शानदार खेळी केली. त्याने 96 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि 1 षटकार ठोकला. अॅलेक्स कॅरी 22 धावा करून नाबाद राहिला. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने 4 बळी घेतले. जेन्सनने 9 षटकांत 32 धावा देत 3 बळी घेतले.
99 धावांत दक्षिण आफ्रिका सर्वबाद
दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 99 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान संघाचे 4 खेळाडू खातं न उघडताच बाद झाले. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. कमिन्सनं 5 विकेट्स घेतल्या. त्याने 12.4 षटकात 42 धावा देत 3 मेडन ओव्हर्सही टाकल्या. तर स्टार्क आणि बोलंड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 35 धावा केल्या आणि सामना 6 विकेट्सनी जिंकला.
हे देखील वाचा-