Australia women cricketers allegedly molested in Indore : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या आधीच भारतासाठी लाजिरवाणी घटना घडली. ऑस्ट्रेलियन महिला संघातील दोन खेळाडूंशी एका युवकाने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजता इंदूरमधील खजराना रोड परिसरात घडली, जेव्हा दोन्ही खेळाडू हॉटेलमधून कॅफेकडे चालत जात होत्या.

Continues below advertisement

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड

मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबरच्या सकाळी ऑस्ट्रेलियन संघातील दोन खेळाडू हॉटेल रॅडिसन ब्लूहून कॅफेकडे जात होत्या. त्यावेळी पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेला एक युवक बाइकवरून त्यांच्या मागे लागला. काही अंतर गेल्यानंतर त्या युवकाने एका खेळाडूला अयोग्य रीतीने स्पर्श केला आणि लगेच घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे दोन्ही खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी तत्काळ संघाच्या सुरक्षा अधिकाऱ्याला, डॅनी सिमन्स यांना मेसेज केला. सिमन्स यांनी लगेच टीम मॅनेजमेंटला माहिती दिली आणि खेळाडूंना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये परत आणण्यात आले. दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असून महिला क्रिकेटमधील नामांकित चेहरे आहेत.

Continues below advertisement

पोलिसांची कारवाई

एमआयजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त संतोष सिंग यांच्या निर्देशानुसार विजय नगर, एमआयजी, खजराना, कनाडिया आणि परदेशीपुरा ठाण्यांची संयुक्त टीम स्थापन करण्यात आली. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख खजराना येथील अकील म्हणून पटली. पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी त्याला अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, अकीलवर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद आहेत आणि तो सध्या आजाद नगर भागात राहत होता.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ

घटनेची माहिती जिल्हा प्रशासन आणि क्रिकेट बोर्डालाही देण्यात आली आहे. या घटनेनंतर विदेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगली आहे. हॉटेलपासून स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा अधिकारी सिमन्स यांनी सांगितले की, खेळाडूंनी पाठवलेला मेसेज हा ‘इमर्जन्सी कोड’ होता, जो कोणत्याही धोका किंवा पाठलाग झाल्यास वापरला जातो.

आज होणार उपांत्य सामना

या घटनेनंतरही आज, शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी इंदौरच्या होळकर स्टेडियमवर आयसीसी महिला वर्ल्ड कपचा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये दुपारी 3 वाजता हा सामना रंगणार आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची पातळी अधिक कडक करण्यात आली आहे, जेणेकरून अशा अप्रिय घटना पुन्हा घडू नयेत.

हे ही वाचा -

Virat Kohli : हुश्श... विराट कोहलीने पहिली धाव काढताच सिडनीचं अख्खं मैदान नाचायला लागलं, शून्याची साडेसाती संपली, पाहा Video