एक्स्प्लोर

AUS Vs SA 3rd ODI : 36 चौकार, 18 षटकार... 431 धावांचा डोंगर; ट्रॅव्हिस हेडने आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या चिंधड्या केल्या, इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं...

Australia Vs South Africa 3rd Odi Match 2025 Highlights : रविवारी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि कॅमरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेची धुलाई करत त्यांच्या अक्षरशः चिंधड्या केल्या.

Australia vs South Africa 3rd ODI : रविवारी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि कॅमरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेची धुलाई करत त्यांच्या अक्षरशः चिंधड्या केल्या. मॅकेच्या मॅकेच्या ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत कांगारू संघाने फक्त दोन गडी गमावून तब्बल 431 धावा केल्या. यादरम्यान, त्यांनी 36 चौकार आणि 18 षटकार मारले. हा ऑस्ट्रेलियाचा वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावसंख्या विक्रम ठरला. केवळ चार धावांनी ते त्याचा सर्वात मोठा स्कोर मोडण्यापासून चुकले.

इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं...

या सामन्यात सलामीवीर ट्रॅव्हिस हेड, कार्यवाहक कर्णधार मिचेल मार्श आणि अष्टपैलू कॅमरून ग्रीन यांनी शतकं ठोकत इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाच्या वनडे इतिहासात प्रथमच तीन खेळाडूंनी एका सामन्यात शतकं झळकावली. यापूर्वी हे पराक्रम केवळ दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने केला होता.

ट्रॅव्हिस हेडने आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या चिंधड्या केल्या

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला हेड आणि मार्श या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 250 धावांची भागीदारी केली. हेडने 103 चेंडूत 142 धावा करताना 17 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याला केशव महाराजने आऊट केले. दुसरीकडे मार्शने 106 चेंडूत 100 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या दरम्यान त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतल्या 3,000 धावा पूर्ण केल्या.

मार्श आऊट झाल्यानंतर ग्रीनने जबरदस्त आक्रमक फलंदाजी करत पहिल्याच शतकाची नोंद केली. फक्त 47 चेंडूत शतक ठोकत त्याने वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात जलद शतकवीर होण्याचा मान मिळवला. सर्वात जलद शतक ग्लेन मॅक्सवेलने 40 चेंडूत 2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध ठोकले होते. ग्रीनने अखेरपर्यंत 55 चेंडूत नाबाद 118 धावा ठोकल्या ज्यात 6 चौकार आणि 8 षटकार होते. ग्रीनला अलेक्‍स केरीने (37 चेंडूत नाबाद 50 धावा, 7 चौकार) अप्रतिम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 164 धावांची अखंड भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला डोंगराएवढ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवली.

ऑस्ट्रेलियाची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या 

  • 434/4 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2006
  • 431/2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मॅके, 2025
  • 417/6 विरुद्ध अफगाणिस्तान, WACA, 2015
  • 399/8 विरुद्ध नेदरलँड्स, दिल्ली, 2023

एका वनडे सामन्यात संघासाठी शतक करणारे तीन खेळाडू

  • दक्षिण आफ्रिका (अमला, रोसो, एबी व्हिलियर्स) विरुद्ध वेस्ट इंडिज, जोहान्सबर्ग, 2015
  • दक्षिण आफ्रिका (क्विंटन, फाफ डू प्लेसिस, एबी व्हिलियर्स) विरुद्ध भारत, वानखेडे, 2015
  • इंग्लंड (सॉल्ट, मलान, बटलर) विरुद्ध नेदरलँड्स, अ‍ॅमस्टेलवीन, 2022
  • दक्षिण आफ्रिका (क्विंटन, रॅसी, मार्कराम) विरुद्ध श्रीलंका, दिल्ली 2023
  • ऑस्ट्रेलिया (हेड, मार्श, ग्रीन) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मॅके, 2025

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
IND vs NZ 1st ODI : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
IND vs NZ 1st ODI Score : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget