Aus vs Ind 2nd Adelaide Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. या डे-नाईट पिंक बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव 180 धावांवर संपला. नितीश रेड्डी यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या. दिवसाच्या खेळाच्या तिसऱ्या सत्रात यजमान संघ फलंदाजी करत असताना अचानक काहीतरी घडले, त्यामुळे अचानक थांबवण्याची वेळ आली.
फ्लड लाइट्सने अचानक केला विश्वासघात
खरंतर, तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना फ्लड लाइट्समध्ये बिघाड झाल्याने खेळ काही काळ थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 18व्या षटकात अचानक लाइट गेले. दोन मिनिटांच्या विलंबानंतर लाइट परत आले, परंतु काही चेंडूंनंतर पुन्हा तेच घडले. मार्नस लॅबुशेन आणि नॅथन मॅकस्वीनी क्रीझवर फलंदाजी करत असताना ही घटना घडली.
एकाच षटकात दोनदा घडली घटना
ही संपूर्ण घटना 18 व्या षटकात घडली, जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील फक्त दोन चेंडू टाकले होते, त्यानंतर अचानक लाईट गेली. पण काही सेकंदात लाईट आली. सामना सुरू पण झाला. तितक्यात दुसऱ्यांदा लाईट गेली. यावेळी मात्र चाहत्यांनी मोबाईलचे दिवे लावले आणि त्याचा आनंद लुटला. हर्षित राणा रनअपवर असताना ही घटना घडली आणि दिवे बंद झाल्यामुळे तो खूपच नाराज दिसत होता.
भारताचा डाव 180 धावांवर कोसळला
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 6 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा डाव 44.1 षटकांत 180 धावांत गुंडाळला. नितीश रेड्डीने वेगवान फलंदाजी करत संघाकडून सर्वाधिक 42 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. सामन्याचा पहिला चेंडू भारताने यशस्वी जैस्वाल (0) च्या रूपाने मोठी विकेट गमावली. त्यानंतर केएल राहुल (37) आणि शुभमन गिल (31) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची चांगली भागीदारी झाली. ऋषभ पंतने 21 आणि रविचंद्रन अश्विनने 22 धावांचे योगदान दिले. विराट कोहली (7) आणि रोहित शर्मा (3) हे काही खास करू शकले नाहीत.
हे ही वाचा -