Asian Games 2026 All Team Squad : जपानच्या यजमानपदाखाली सप्टेंबर-ऑक्टोबर 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी पुरुष क्रिकेटमधील तयारीला वेग आला आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून, त्यापैकी आतापर्यंत चार संघांनी आपले स्क्वाड जाहीर केले आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ओमान या चार संघांचा समावेश आहे. आता उर्वरित सहा संघांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.

Continues below advertisement

भारत-पाकिस्तानला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश (India and Pakistan Asian Games 2026)

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटमध्ये एकूण 10 संघ मैदानात उतरतील. बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना त्यांच्या रँकिंगच्या आधारावर थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तर अफगाणिस्तान, हाँगकाँग चायना, जपान, मलेशिया, नेपाळ आणि ओमान या सहा संघांना पहिल्या फेरीतून पुढे जावे लागणार आहे. त्यामुळे या संघांसाठी सुरुवातीपासूनच प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

Continues below advertisement

भारताची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे, तर पाकिस्तानची कमान फरहानकडे

भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला असून, स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे संघाला पहिल्या फेरीतील सामने खेळावे लागणार नाहीत. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्ताननेही आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व साहिबजादा फरहान करणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेटमधील आणखी एक रोमांचक अध्याय आशियाई क्रीडा स्पर्धेत पाहायला मिळू शकतो. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे त्यांच्यातील संभाव्य सामना बाद फेरीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे.

 या सहा संघांची घोषणा अद्याप बाकी

10 पैकी चार संघांचे स्क्वाड जाहीर झाले असले तरी अजून सहा संघांकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. नेपाळ, हाँगकाँग चायना, मलेशिया, बांगलादेश, जपान आणि श्रीलंका या संघांचे स्क्वाड अद्याप समोर आलेले नाहीत. विशेष म्हणजे बांगलादेश आणि श्रीलंकेला रँकिंगच्या आधारावर भारत आणि पाकिस्तानप्रमाणेच थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांच्या संघरचनेकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत जाहीर झालेल्या 4 संघांचा Squad  

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वैभव सूर्यवंशी, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान : साहिबजादा फरहान (कर्णधार), अब्दुल समद (उपकर्णधार), अबरार अहमद, अहमद दानियाल, अकिफ जावेद, अली रझा, अराफत मिन्हास, हैदर अली, हसन नवाज, माझ सदाकत, मोहम्मद सलमान मिर्झा, साद मसूद, सैम अयुब, सुफयान मोकीम, उस्मान खान (यष्टीरक्षक)

अफगाणिस्तान : दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), मोहम्मद अक्रम, हसन इसाखिल, खालिद तानिवाल, इम्रान मीर, फैसल खान शिनोजादा, नजीबुल्ला जद्रान, फरमानुल्ला साफी, इस्मत आलम, करीम जनात, नांग्याल खरोती, अरब गुल मोमंद, फरीदून दाऊदझई, अब्दुल्ला अहमदझाई.

ओमान : सुफयान महमूद (कर्णधार), वाहिद अल बलुशी, झुबेर अल बलुशी, इसा अल बालुशी, नावेद अल बालुशी, फारिस अल बालुशी, मोहम्मद उस्मान, मुझफ्फर शिराळकर (यष्टीरक्षक), मोहम्मद अल बलुशी, शोएब अल बलुशी, वसीम अल बलुशी, कैस अल बलुशी, अब्दुल जलील, अहमद अल जदजाली, समीर ओथमान.

हे ही वाचा -

Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल