Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळच्या संघासोबत आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. आता मंगळवारपासून टीम इंडिया आशियाई क्रीडा स्पर्धेत सुरुवात करत आहे. ऋतुराज गायकवाडच्या संघाकडून क्रीडा चाहत्यांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने महिला क्रिकेट स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेय. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता भारत आणि नेपाळ यांच्यातील लढत होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून मोठ्या विक्रमांची अपेक्षा असेल. या सामन्याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात..
कुठे होणार सामना -
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले आहेत. सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंडवर खेळले जातील. ZJUT क्रिकेट स्टेडियम थरार पाहायला मिळणार आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना कधी सुरु होणार?
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना 3 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता होणार आहे. त्यापूर्वी नाणेफेक होईल.
एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार ?
आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल. सोनी लाइव्ह अॅपवर अथवा संकेतस्थळावर मोफत सामना पाहता येईल.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि नेपाळचे संघ -
भारत- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, अवेश खान , अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू : यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.
नेपाळ- रोहित पौडेल (कर्णधार), करण केसी, प्रैटिस जीसी, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, गुलशन झा, सोमपाल कामी, सुदीप जोरा, बिनोद भंडारी, कुशल भुर्टेल, दीपेंद्र सिंह ऐरी, ललित राजबंशी, बिबेक कुमार यादव, अभिनाश बोहरा, संदीप लामिछाने.