एक्स्प्लोर

Asia Cup Trophy Ind vs Pak: चला, मी तुमची ट्रॉफी देतो, पण...; मोहसीन नक्वीने भारतासमोर ठेवली एक अट, नेमकं काय म्हणाला?

Asia Cup Trophy Ind vs Pak: एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता.

Asia Cup Trophy Ind vs Pak: आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) 28 सप्टेंबर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यानंतर दुबईतील मैदानात ट्रॉफीवरुन जोरदार राडा झाला. भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला.

आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या (Mohsin Naqvi) हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता. मोहसीन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एक प्रभावशाली पाकिस्तानी राजकारणी आहेत. संपूर्ण जगासमोर अपमानित झाल्यानंतर, पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीने आशिया कप ट्रॉफी भारताला सादर करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र ट्रॉफी देण्यासाठी एक अटही मोहसीन नक्वीने ठेवली आहे. 

मोहसीन नक्वीने कोणती अट ठेवली? (Mohsin Naqvi set a condition)

ट्रॉफी सादरीकरणासाठी पुन्हा एक समारंभ आयोजित करा, अशी अट मोहसीन नक्वीने ठेवली आहे. परंतु असा समारंभ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काही दिवस ट्रॉफीवरुन वाद कायम राहण्याची शक्यता दिसून येतेय. 

भारतीय संघाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही? (Why didnt team india take Asia Cup trophy?)

पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिला. भारताने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही, यामागील कारण आता समोर आलं आहे. भारताच्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही. "पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे, असं देवजीत सैकिया (Devajit Saikia) म्हणाले. दरम्यान, पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला.

ट्रॉफीबाबत आयसीसीचे नियम काय?(ICC rules regarding trophies?)

ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधाराने नकार देणे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था (ACC) किंवा ICC याबाबत निर्णय घेईल. सदर घटनेप्रकरणी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहेत का आणि जर तसे असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार होते आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात, याबाबत आयसीसीकडून तपास केला जाऊ शकतो. 

संबंधित बातमी:

Ind Vs Pak Asia Cup: मॅच संपल्यावर आम्ही दीड तास ताटकळत, ट्रॉफी घ्यायला जाणार इतक्यात ते लोक.... सूर्यकुमार यादवने सांगितली दुबईच्या मैदानातील Inside Story

भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
Ishan Kishan News : 27 चौकार, 7 षटकार... 250 धावा ठोकल्या अन् अचानक मैदान सोडलं! ईशान किशनसोबत नेमकं काय घडलं? सगळेच घाबरले
27 चौकार, 7 षटकार... 250 धावा ठोकल्या अन् अचानक मैदान सोडलं! ईशान किशनसोबत नेमकं काय घडलं? सगळेच घाबरले
Ishan kishan Double Century : सगळे पाहत राहिले अन् ईशान किशन बरसत राहिला! फायनलमध्ये ठोकले द्विशतक, दिग्गजांच्या पंक्तीत बसत इतिहासाच्या पानावर नाव कोरलं
सगळे पाहत राहिले अन् ईशान किशन बरसत राहिला! फायनलमध्ये ठोकले द्विशतक, दिग्गजांच्या पंक्तीत बसत इतिहासाच्या पानावर नाव कोरलं
Hardik Pandya VIDEO : खांद्यावर हात अन्... हार्दिक पांड्या 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीबरोबर बंगळुरूच्या हॉटेलमध्ये दिसला, VIDEO
खांद्यावर हात अन्... हार्दिक पांड्या 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीबरोबर बंगळुरूच्या हॉटेलमध्ये दिसला, VIDEO

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
मोठी बातमी! महापौर रितू तावडेंची घोषणा; ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी! महापौर रितू तावडेंची घोषणा; ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द
Gold Silver Price: सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
Embed widget