Asia Cup Trophy Ind vs Pak Final: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) अंतिम सामन्यात भारताने 5 विकेट्सने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकाचे जेतेपद (Ind vs Pak Final) पटकावले. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. तसेच अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीच्या (Mohsin Naqvi) हस्ते आशिया चषक स्पर्धेतील ट्रॉफी (Asia Cup Trophy) आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास देखील भारतीय संघातील खेळाडूंनी नकार दिला. यानंतर मोहसीन नक्वी आशिया चषक स्पर्धेतील ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंनी वैयक्तिक पदकं घेऊन हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केले. सदर प्रकरणानंतर आता बीसीसीआय (BCCI) आयसीसीकडे (ICC) तक्रार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यादरम्यान, भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, याबाबत जाणून घ्या...

Continues below advertisement

ट्रॉफीबाबत आयसीसीचे नियम काय? (ICC rules regarding trophies?)

ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधाराने नकार देणे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था (ACC) किंवा ICC याबाबत निर्णय घेईल. सदर घटनेप्रकरणी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहेत का आणि जर तसे असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार होते आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात, याबाबत आयसीसीकडून तपास केला जाऊ शकतो. 

Continues below advertisement

टीम इंडियाचा ट्रॉफीवर अधिकार- (Team India Asia Cup Trophy)

भारतीय संघाचा आशिया कप 2025 च्या ट्रॉफीवर पूर्णपणे अधिकार आहे. भारतीय संघाने या ट्रॉफीसाठी कठोर परिश्रम केले आणि सर्व प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले. जर भारतीय खेळाडूंना मोहसीन नक्वीशी हस्तांदोलन करायचे नसेल किंवा त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायची नसेल आणि असे करण्यास मनाई करणारे कोणतेही नियम नाहीत, तर त्यात काहीही गैर नाही. पण एखाद्या संघाने नुकताच जिंकलेला ट्रॉफीचा अधिकार हिरावून घेणे आणि तो सोबत घेऊन जाणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.

नेमकं काय घडलं? (Ind vs Pak Final What happened?)

भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते.

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

Shoaib Akhter Ind vs Pak Asia Cup Final 2025: भारताने पुन्हा लोळवलं, ट्रॉफीवरुन राडा; शोएब अख्तरने पाकिस्तानला धू धू धुतलं, म्हणाला, आता थोडं...