एक्स्प्लोर

India vs Pakistan : ट्रॉफी घेऊन पळून गेलेल्या पाकिस्तानशी टीम इंडिया पुन्हा भिडणार, ACC कडून वेळापत्रकाची घोषणा, जाणून घ्या कधी होणार हायहोल्टेज सामना

आशिया कप 2025 जिंकूनही भारतीय संघाला अजून ट्रॉफी मिळालेली नाही. हा वाद अजून मिटलेलाच नव्हता की आशियाई क्रिकेट परिषदने एक नवीन स्पर्धेची घोषणा केली आहे.

Asia Cup Rising Stars Championship Schedule Update : आशिया कप 2025 जिंकूनही भारतीय संघाला अजून ट्रॉफी मिळालेली नाही. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या नीच वागणुकीमुळे टीम इंडिया ट्रॉफीशिवाय दुबईहून परतली होती. हा वाद अजून मिटलेलाच नव्हता की आशियाई क्रिकेट परिषदने (Asian Cricket Council) एक नवीन स्पर्धेची घोषणा केली आहे, ज्यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. ही स्पर्धा 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपचं वेळापत्रक जाहीर

आशियाई क्रिकेट परिषदने आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत 16 नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक थरारक सामना होणार आहे. पूर्वी इमर्जिंग आशिया कप म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा आता 14 ते 23 नोव्हेंबरदरम्यान कतारच्या दोहा येथील वेस्ट एंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, ओमान, यूएई आणि हाँगकाँग हे एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकाच गटात ठेवण्यात आले आहे.

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

कसोटी खेळणारे पाच आशियाई देश आपापल्या ‘अ’ संघांना उतरवतील, तर यूएई, ओमान आणि हाँगकाँग आपले वरिष्ठ (सीनियर) संघ घेऊन या चॅम्पियनशिपमध्ये खेळतील. एकूण 15 टी20 सामने खेळवले जातील. भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई हे पहिल्या गटात आहेत. दुसऱ्या गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सुपर-4 टप्पा नसेल, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अफगाणिस्तानने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

वैभव सूर्यवंशीला संघात संधी

मागील हंगामात भारतीय संघात अभिषेक शर्मा, राहुल चाहर, प्रभसिमरन सिंग, साई किशोर आणि अंशुल कंबोज यांसारखे खेळाडू होते, आणि तिलक वर्मा कर्णधार होता. यंदाच्या रायझिंग स्टार्स स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पूर्ण झाली असून त्यात वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे. बीसीसीआय लवकरच संपूर्ण संघाची घोषणा करणार आहे. दरम्यान, अंडर-19 आशिया कप डिसेंबरमध्ये खेळवला जाणार आहे, मात्र त्याच्या तारखा आणि ठिकाण अजून निश्चित झालेले नाहीत.

आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 वेळापत्रक

  • 14 नोव्हेंबर, पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध ओमान – दुपारी 12 वा.
  • 14 नोव्हेंबर, भारत ‘अ’ विरुद्ध यूएई – संध्याकाळी 5 वा.
  • 15 नोव्हेंबर, बांगलादेश ‘अ’ विरुद्ध हॉंगकॉंग – दुपारी 12 वा.
  • 15 नोव्हेंबर, श्रीलंका ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’ – संध्याकाळी 5 वा.
  • 16 नोव्हेंबर, यूएई विरुद्ध ओमान – दुपारी 12 वा.
  • 16 नोव्हेंबर, भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ – संध्याकाळी 5 वा.
  • 17 नोव्हेंबर, श्रीलंका ‘अ’ विरुद्ध हॉंगकॉंग – दुपारी 12 वा.
  • 17 नोव्हेंबर, बांगलादेश ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’ – संध्याकाळी 5 वा.
  • 18 नोव्हेंबर, पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध यूएई – दुपारी 12 वा.
  • 18 नोव्हेंबर, भारत ‘अ’ विरुद्ध ओमान – संध्याकाळी 5 वा.
  • 19 नोव्हेंबर, अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्ध हॉंगकॉंग – दुपारी 12 वा.
  • 19 नोव्हेंबर, श्रीलंका ‘अ’ विरुद्ध बांगलादेश ‘अ’ – संध्याकाळी 5 वा.

 सेमीफायनल्स व अंतिम सामना

  • 21 नोव्हेंबर, सेमीफायनल 1: गट अ1 विरुद्ध गट ब2 – दुपारी 12 वा. 
  • 21 नोव्हेंबर, सेमीफायनल 2: गट अ2 विरुद्ध गट ब1 – संध्याकाळी 5 वा.

 23 नोव्हेंबर 

अंतिम सामना – संध्याकाळी 5 वा.

प्रत्येक दिवशी पहिला सामना दुपारी 12 वाजता व दुसरा सामना संध्याकाळी 5 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) खेळला जाईल.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
Lenskart IPO : लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha
Nashik Mahapalika : नाशिक महापालिकेत मनसे-मविआ एकत्र लढणार
Vijay Waddettiwar On Bacchu Kadu : बच्चू कडू बोलले ते काही वाईट नाही, विजय वडेट्टीवार स्पष्ट बोलले
MCA Election: एमसीए अध्यक्षपदासाठी रस्सीखेच, पवार-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
Sangli Shop Fire : विटा शहरात दुकानाला भीषण आग, चौघांचा मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
Lenskart IPO : लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
लेन्सकार्टचा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, शेअर किती रुपयांवर पोहोचला?
Sandeep Deshpande on Ashish Shelar: 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
Renuka Shahane: 'महिन्याला पगार देतो फक्त माझ्यासोबत...'; रेणुका शहणेंकडून एका विवाहित निर्मात्याचा पर्दाफाश, म्हणाल्या...
'महिन्याला पगार देतो फक्त माझ्यासोबत...'; रेणुका शहणेंकडून एका विवाहित निर्मात्याचा पर्दाफाश, म्हणाल्या...
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
Embed widget