Pakistan Cricketer Retirement : आशिया कप 2025 दरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा ट्रेंड सुरूच आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारीने निवृत्तीची घोषणा केली. आता आणखी एक वेगवान गोलंदाज वकास मकसूदने वयाच्या 37 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने पाकिस्तानसाठी फक्त एक टी-20 सामना खेळला, जो 2018 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध होता.

Continues below advertisement

आशिया कपदरम्यान अचानक पाकच्या खेळाडूने घेतली निवृत्ती 

वकास मकसूदने पाकिस्तानसाठी फक्त एक टी-20 सामना खेळला. दुबईमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात मकसूदने 1.5 षटके गोलंदाजी केली आणि 2 विकेट्स घेतल्या. तो पाकिस्तानसाठी टी-20 स्वरूपात पदार्पण करणारा 80 वा खेळाडू ठरला होता. त्या सामन्यात त्याने लॉकी फर्ग्युसन आणि सेथ रॅन्स यांना फक्त 5 चेंडूत बाद केले.

Continues below advertisement

पाकिस्तान फैसलाबादमध्ये जन्मलेल्या वकास मकसूदने सुमारे एक दशक चाललेल्या त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीत बरीच ओळख मिळवली. त्याने 81 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 294 विकेट्स घेतल्या. त्याने त्याच्या लिस्ट-ए कारकिर्दीतही चांगले यश मिळवले, जिथे त्याने 56 सामन्यांमध्ये 87 विकेट्स घेतल्या. त्याच्याकडे 68 टी-20 सामन्यांमध्ये 77 विकेट्स आहेत.

मकसूद पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळला आहे. त्याने इस्लामाबाद युनायटेड आणि कराची किंग्ज या दोन्ही संघांसाठी पीएसएलमध्ये एकूण 20 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 27 विकेट्स घेतल्या. त्याने नोव्हेंबर 2023 मध्ये त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा ट्रेंड सुरूच 

उस्मान शिनवारीनेही दोन दिवसांपूर्वी निवृत्ती घेतली. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानसाठी 34 सामने खेळले आणि 48 विकेट्स घेतल्या. त्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही.

हे ही वाचा -

IND vs PAK Asia Cup 2025 : 5 फलंदाज, 3 अष्टपैलू, 3 गोलंदाज... सूर्याने आखला पाकिस्तानविरुद्ध मोठा डाव! 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11