IND vs PAK Head To Head Record In Asia Cup नवी दिल्ली : 2026 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून आशिया कप स्पर्धा टी 20 प्रकारात खेळवली जात आहे. आशिया कप स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरात विरुद्ध होणार आहे. मात्र, या स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान ग्रुप स्टेजमधील लढतीसाठी आमने सामने येणार आहेत. यापूर्वी देखील आशिया कप स्पर्धा टी 20 प्रकारात खेळवली गेली आहे. आशिया कप 2016 आणि 2022 मध्ये टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला गेला होता. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीत कोण जिंकलेलं, कोणाचा पराभव झालेला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये टी 20 सामन्यांमध्ये तीन वेळा आमने सामने आले आहेत. भारतानं दोन वेळा विजय मिळवला तर पाकिस्तानला एकदा विजय मिळवता आला आहे. म्हणजेच आशिया कप टी 20 मध्ये भारत 2-1 अशा आघाडीवर आहे.

आशिया कप 2022

2022 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमने सामने आले होते. भारतानं एकदा विजय मिळवला तर एका सामन्यात पराभव झाला होता. दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये होते. लीग मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत केलं होतं. मात्र, सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. त्यावेळी पाकिस्ताननं भारताला 5 विकेटनं पराभूत केलं. आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये श्रीलंकेनं पाकिस्तानला 23 धावांनी पराभूत केलं होतं.

आशिया कप 2016

2016 मध्ये आशिया कप स्पर्धा पहिल्यांदा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आली. त्या वर्षी भारत आणि पाकिस्तान केवळ एकदाच आमने सामने आले होते. ज्यामध्ये भारतानं पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत केलं होतं. 2016 ची आशिया कपची फायनल भारत आणि बांगलादेश यांच्यात झाली होती. ज्यामध्ये भारतानं 8 विकेटनं विजय मिळवला होता.

आशिया कप 2025 मध्ये भारत पाकिस्तान तीन वेळा आमने सामने

आशिया कप 2025 तिसऱ्यांदा टी 20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात. ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान सुपर 4 साठी क्वालिफाय झाल्यास दोन्ही संघ सुपर फोरमध्ये 21 सप्टेंबरला आमने सामने येऊ शकतात. दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले तर 28 सप्टेंबरला आमने सामने येऊ शकतात.

आशिया कपसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

आशिया कप 2025 संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग

10 सप्टेंबर भारत विरुद्ध यूएई

11 सप्टेंबर बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग

12 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध ओमान

13 सप्टेंबर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका

14 सप्टेंबर भारत विरुद्ध पाकिस्तान

15 सप्टेंबर यूएई विरुद्ध ओमान

15 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग

16 सप्टेंबर बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

17 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध यूएई

18 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान

19 सप्टेंबर भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर बी1 विरुद्ध बी2

21 सप्टेंबर ए1 विरुद्ध ए2

23 सप्टेंबर ए2 विरुद्ध बी1

24 सप्टेंबर ए1 विरुद्ध बी2

25 सप्टेंबर ए2 विरुद्ध बी2

26 सप्टेंबर ए1 विरुद्ध बी1

28 सप्टेंबर अंतिम सामना