IND vs SL, Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) चा खिताब आता भारताच्या नावावर झाला आहे. आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा डाव 50 धावांवर गुंडाळला. भारतीय गोलंदाजांचा समोर श्रीलंकेचा संघ पुरता ढासळला. सिरजने भेदक मारा करत सात विकेट घेतले. तर, पांड्यानेही तीन गडी बाद केले. टीम इंडियाने श्रीलंकेला 50 रन्सवर ऑल आऊट केलं. भारताने 15.2 ओव्हकमध्ये श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ने भारतासाठी भेदक गोलंदाजी केली. सिराजने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 17 धावा केल्या. हेमंताने 13 धावा केल्या.


टीम इंडिया आशिया चषक 2023 चा विजेता


आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. टीम इंडियाने श्रीलंकेला 50 धावांवर ऑलआउट केलं. प्रत्युत्तरात अवघ्या 6.1 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठलं. मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या विजयाचा 'सूपरहिरो' ठरला होता. सिराजने सहा विकेट घेतल्या. तर शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या सलामी जोडीनं फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने नाबाद 27 तर ईशान किशनने नाबाद 23 धावा केल्या.






श्रीलंकेवर भारतीय गोलंदाजांची वर्चस्व


अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेवर वर्चस्व गाजवलं. श्रीलंकेने 10 षटकांत 6 गडी गमावून 31 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेला सामन्यात वापसी करता आली नाहीच. अवघ्या 15.2 षटकांत फक्त 50 करून श्रीलंका संघ ऑलआऊट झाला.  



अखेर 24 वर्षांनंतर भारतानं घेतला बदला! 


भारतीय संघाने (Indian Cricket Team) 1999 च्या बदला घेतला आहे. अखेर 24 वर्षांनंतर टीम इंडियाने वचपा काढला आहे. 1999 च्या कोको-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेने भारताला अवघ्या 54 धावांवर बाद केलं होतं. 54 धावांवर टीम इंडियाचा संपूर्ण संघ तंबूत परतला होता. आता तब्बल 24 वर्षांनंतर भारताने वचपा काढत श्रीलंकेला 50 धावांवर सर्वबाद केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Asia Cup 2023 : श्रीलंकेच्या नावावर लाजीरवाणा विक्रम! अवघ्या 50 धावांत आटोपला डाव; 23 वर्षांनंतर रचला नकोसा विक्रम