Aryaman Birla net worth : भारतात क्रिकेट एवढी लोकप्रियता कोणत्या खेळालाच मिळाल नाही. भारतातील गल्लो-गल्लीत तुम्हाला मुलं क्रिकेट खेळताना दिसतील. इंडियामध्ये क्रिकेटरचा दर्जा बॉलिवूड स्टार किंवा कोणत्या सेलिब्रिटीपेंक्षा कमी नसतो. यातून खेळाडूंना पैसा देखील खूप मिळतो. क्रिकेटमधील खेळाडूंच्या लॅव्हिश लाईफ आणि संपत्तीची देखील तेवढीच चर्चा होते. मात्र जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण आहे? क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीसह कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेटमधील श्रीमंत खेळांडूमध्ये गणना होते. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर या तिघांपैकी एकही नाही. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आयपीएल 2018 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र, तरिही तुम्ही त्याची संपत्ती पाहून हैराण व्हाल...
राजस्थान रॉयल्सच्या संघात झाला होता समावेश
प्रसिद्ध उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. आर्यमनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. आर्यमनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना जानेवारी 2019 मध्ये इंदूरमध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध खेळला. यानंतर मात्र तो बिझनेस पाहू लागला. आज आर्यमन बिर्ला एक यशस्वी उद्योगपती आहे. बिर्ला समूहाच्या वारस असलेल्या या मुलाने 2017-18 मध्ये क्रिकेट विश्वात प्रवेश केला. त्यानंतर या क्रिकेटपटूची निवड मध्य प्रदेशच्या रणजी संघात झाली आणि आयपीएल 2018 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याचा संघात समावेश केला. आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने आर्यमनला 30 लाख रुपयांना विकत घेतले.
आर्यमन बिर्लाकडे सचिन तेंडुलकरच्या संपत्तीपेक्षा 6 पट संपत्ती
मीडिया रिपोर्टनुसार, आर्यमन बिर्ला सध्या फॅमिली बिझनेसवर लक्ष केंद्रित करत आहेत. आर्यमन बिर्ला यांची एकूण संपत्ती 70,000 कोटी रुपये आहे. जी सचिन तेंडुलकरच्या एकूण संपत्तीपेक्षा जवळपास 6 पट जास्त आहे. जवळपास 24 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपये आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच त्याच्या कारकिर्दीतील चौथी आयसीसी ट्रॉफी जिंकली. कोहली पुन्हा एकदा आरसीबीकडून आयपीएल खेळणार आहे. त्याने अनेक विक्रम केले आहेत. कोहलीची गणना जगातील सर्वात फिट खेळाडूंमध्ये केली जाते. तो सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केला जाणारा भारतीय सेलिब्रिटी आहे. कोहलीची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपये आहे. कोहलीची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपये आहे. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती अंदाजे 923 कोटी रुपये आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
