Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) नुकतीच भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेइंग-11 जाहीर केली आहे. त्याच्या या संघाने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण भारताच्या महान क्रिकेटपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या अनेक दिग्गजांना अर्शदीप सिंगने संघात स्थान दिलेले नाही. विशेष म्हणजे, भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर मानल्या जाणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) अर्शदीप सिंगने सलामीला न पाठवता मधल्या फळीत स्थान दिले आहे.

Continues below advertisement

अर्शदीपने आपल्या संघात सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. या निर्णयामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले, कारण सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या दिग्गज सलामीवीरांना अर्शदीप सिंगने ऑलटाईम सर्वोत्तम प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले नाही. तिसऱ्या क्रमांकावर अर्शदीपने राहुल द्रविडची निवड केली आहे, तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला स्थान दिले आहे. विशेष म्हणजे, विराटने आपल्या कारकिर्दीतील बहुतांश यशस्वी खेळी तिसऱ्या क्रमांकावर करताना केल्या आहेत. मात्र, अर्शदीपने त्याला चौथ्या क्रमांकासाठी योग्य मानले. (Team India)

रोहित शर्माला सहाव्या क्रमांकावर स्थान, अर्शदीपचा सिंगचा धक्कादायक निर्णय- (Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI)

रोहित शर्माला सहाव्या क्रमांकावर स्थान देणे हा अर्शदीपच्या निवडीतील आणखी एक धक्कादायक निर्णय ठरला. रोहितला जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक मानले जाते आणि वनडे तसेच टी-20 क्रिकेटमध्ये त्याने सलामीवीर म्हणून अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. तरीही अर्शदीपने त्याला मधल्या फळीत खेळवण्याचा निर्णय घेतला. पाचव्या क्रमांकावर त्याने 2011 विश्वचषकातील नायक युवराज सिंहची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीची निवड करण्यात आली आहे. गोलंदाजी विभागात अर्शदीपने स्वतःलाही स्थान दिले आहे. तसेच हरभजन सिंगला एकमेव प्रमुख फिरकीपटू म्हणून निवडले असून, झहीर खान आणि जसप्रीत बुमराह यांना वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान दिले आहे.

Continues below advertisement

अर्शदीप सिंगने निवडलेली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेइंग-11- (Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI)

सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, राहुल द्रविड, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), हरभजन सिंग, झहीर खान, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

संबंधित बातमी:

Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: