Arshdeep Singh deleted 200-plus Instagram posts : भारतीय संघ आणि पंजाब किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा सोशल मीडियावरील वादांमुळेच जास्त चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यापासून ते चाहत्यांसोबतच्या ऑनलाइन वादापर्यंत, गेल्या काही आठवड्यांत अर्शदीप सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहिला आहे.

Continues below advertisement

अर्शदीपचा धक्कादायक निर्णय (Arshdeep Singh deleted Instagram posts)

या सततच्या टीका आणि वादांच्या पार्श्वभूमीवर अर्शदीप सिंगने मोठं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील 200 हून अधिक पोस्ट डिलीट किंवा आर्काइव्ह केल्या आहेत. विशेष म्हणजे, यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सोबतच्या 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्याचा प्रचंड व्हायरल झालेला रील व्हिडिओदेखील गायब झाला आहे.

Continues below advertisement

अचानक गायब झालं इंस्टाग्राम प्रोफाइल(Arshdeep Singh deleted Instagram posts)

अर्शदीपच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या अकाउंटवर शेकडो पोस्ट होत्या, पण आता फक्त 44 पोस्ट दिसत आहेत. साधारणपणे सेलिब्रिटी ब्रँड मेकओव्हर किंवा वादानंतर सोशल मीडिया क्लीन करतात, मात्र अर्शदीपच्या बाबतीत हे अलीकडच्या ट्रोलिंगशी जोडून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे, या निर्णयावर ना अर्शदीपने ना त्याच्या पीआर टीमने कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.

नेमका काय होता तिलक वर्मा वाद?

या महिन्याच्या सुरुवातीला अर्शदीपने भारतीय खेळाडूंमधील हलक्याफुलक्या मजेशीर क्षणांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, त्या व्हिडिओतील काही शब्दांमुळे मोठा वाद निर्माण झाला. व्हिडिओमध्ये अर्शदीपने तिलक वर्माला मजेत अंधेरा असं म्हटलं होतं. त्याने तिलकला सनस्क्रीन लावली का?”असाही सवाल केला होता. त्यानंतर नमन धीरकडे बोट दाखवत त्याला “पंजाबचा खरा ग्लो” म्हटलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी अर्शदीपवर रंगभेदाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आणि त्याला जोरदार ट्रोल केलं. मात्र या संपूर्ण प्रकरणावर अर्शदीप आणि तिलक वर्मा दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे.

विकेट मिळाल्या, पण धावाही भरपूर दिल्या....

पंजाब किंग्सकडून खेळताना अर्शदीपसाठी आयपीएल 2026 हंगाम संमिश्र आणि महागडा ठरला. 14 सामन्यांत 14 विकेट घेत तो संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला, पण त्याची इकॉनॉमी तब्बल 10.20 इतकी खराब राहिली. अनेक सामन्यांत त्याची लाईन-लेंथ बिघडलेली दिसली आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याने भरपूर धावा दिल्या. मागील हंगामात उपविजेतेपद पटकावणाऱ्या पंजाब किंग्सने यंदा सुरुवातीच्या 7 पैकी 6 सामने जिंकूनही अखेरीस अवघ्या 1 गुणाने प्लेऑफची संधी गमावली. त्यामुळे संघासोबतच अर्शदीपवरही मोठा दबाव निर्माण झाला आहे.

हे ही वाचा -

RCB vs GT Qualifier 1 : मॅच न खेळता आरसीबी जाणार फायनलमध्ये? क्वालिफायर-1 सामन्यापूर्वी धर्मशालामधून आली मोठी बातमी, नेमकं काय घडलं?