जयपूर : विजय हजारेट्रॉफीत मुंबई आणि उत्तराखंडयांच्यातमॅचसुरु असताना मुंबईचा खेळाडू अंगकृषरघुवंशीदुखापतग्रस्त झाला आहे. कॅच पकडताना दुखापतग्रस्तझाल्यानं त्याला मान देखील हलवता येत नव्हती. अंगकृषची स्थिती गंभीर असल्यानंस्ट्रेचरवरुन त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. अंगृषरघुवंशीलाजयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
मुंबई विरुद्ध उत्तराखंडयांच्यातील विजय हजारेट्रॉफीतील सामना जयपूरच्यासवाईमानसिंग मैदानात सुरु आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण केलं जात नाही. कॅच घेण्यासाठी अंगकृषरघुवंशीनं झेप घेतली यात त्याच्या मानेला दुखापत झाली. रघुवंशीला मान फिरवता येत नव्हती. अखेर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं. यानंतर अंगकृषरघुवंशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातीलएकिवीसय मालिकेत कॅच पकडता वनडेचाउपकॅप्टनश्रेयसअय्यरदुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळंश्रेयसअय्यरला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात होतं. त्यामुळंश्रेयसअय्यर भारतात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्याएकदिवसीय मालिकेला मुकला होता. आता मुंबईचा दुसरा खेळाडू अंगकृषरघुवंशी विजय हजारेट्रॉफीतदुखापतग्रस्त झाला आहे. अंगकृषरघुवंशीलाजयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, अंगकृष रघुवंशी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. आगामी आयपीएलपूर्वी तो पुन्हा फिट होत मैदानावर परतणार का याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईचा विजय हजारेट्रॉफीत दुसरा विजय
मुंबईनं विजय हजारेट्रॉफीत सलग दुसरा विजय मिळवला आहे. विजय हजारेट्रॉफीतमुंबईनं पहिल्या सामन्यात सिक्कीमला पराभूत केलं होतं. दुसऱ्या सामन्यात मुंबईनंउत्तराखंडला 51 धावांनी पराभूत केलं आहे. रोहित शर्मानं मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत पहिल्या सामन्यात दमदार खेळी करत शतक केलं होतं. तर, रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात शुन्यावर बाद झाला.
