अनाया बांगरचा क्रश कोण? लग्न करणार का? एबीपी माझावर बेधडक उत्तरं VIDEO
Anaya Bangar : क्रिकेटर अनाया बांगर हिने तिचा क्रश कोण आहे? याबाबत माहिती दिलीये.

Anaya Bangar : भारताचे माजी क्रिकेटपूट संजय बांगर यांचा मुलगा आर्यन (Anaya Bangar) हा पुरुष म्हणून जन्मला. मात्र, ती मनाने स्त्री होती. हा अंतर्गत संघर्ष तिला मानसिकदृष्ट्या खूप त्रास देत होता. अनेक वर्ष ती ही भावना स्वतःतच दाबून ठेवत होती. एके काळी तिला आत्महत्येचे विचारही आले. अखेर 2023 मध्ये तिनं धाडसी निर्णय घेतला आणि हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीसह लिंग पुनर्निर्धारण शस्त्रक्रिया करून स्वतःला पूर्णपणे स्त्री म्हणून स्वीकारलं. त्यानंतर तो अनाया बांगर (Anaya Bangar) झाला. दरम्यान, अनाया बांगर (Anaya Bangar) हिचा क्रश कोण आहे? ती लग्न करणार का? याबाबतच्या प्रश्नांची उत्तर तिने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अनाया बांगर म्हणाली, मी आत्तापर्यंत एकदाच साडी घातली आहे. मी ते एक्स्पोअर करण्याचा प्रयत्न करत आहे. मी इंग्लंडला असल्यामुळं कसं काय करायचं हे मला माहिती नव्हतं. मी स्वत: ट्रान्झीशन करत होते. कपडे वगैरे माझ्यावर कसे चांगले दिसतील हे मी स्वत:चं फिगर आऊट करत होते. मी सध्या जास्त वेस्टर्न कपडे जास्त घालते पण मला भारतीय पद्धतीचे कपडे देखील खूप आवडतात. मला लेहेंगा आणि साडी देखील घालायची आहे. माझं लग्नात लेहेंगा घालायचं स्वप्न आहे. पण मला लग्नाबाबत वाटतं नाही की, मी कायदेशीर दृष्ट्या शासनाला यात इन्वॉल्व करेन. मात्र, ते मला त्या सेरेमनी करायला आवडतात. हॉलिवडू अभिनेता Brad Pitt हा माझा क्रश आहे. बॉलिवूडमध्ये माझा ह्रतिक रोशन हा क्रश आहे.
अनाया बांगरचा जन्म 26 डिसेंबर 2000 रोजी मुंबईमध्ये झाला. ती माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचं अपत्य आहे.. तिचं आधीचं नाव आर्यन बांगर होतं. बालपणापासून ती एका वेगळ्या ओळखीचा शोध घेत होती – स्वतःची खरी ओळख म्हणून तिला स्त्री म्हणून जगायचं होतं.
अनाया यांचं शिक्षण मुंबईच्या डॉन बॉस्को शाळेत झालं आणि नंतर तिनं रिझवी कॉलेजमधून वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतलं. क्रिकेटमध्ये गाढ रुची असलेली अनाया बालवयापासूनच क्रिकेट खेळत होती. इस्लाम जिमखाना येथे प्रशिक्षण घेणाऱ्या अनायाने यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, मुशीर खान यांच्यासोबत मैदान गाजवलं होतं. तिच्या क्रिकेट कौशल्यामुळे विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंकडूनही तिला मार्गदर्शन मिळालं.
दरम्यान, तिच्या या प्रवासात तिला समाजाकडून, कुटुंबाकडून आणि क्रिकेटविश्वाकडूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ट्रान्सजेंडर महिला म्हणून तिला अपमानास्पद वागणूक दिली गेली. काही सहकारी खेळाडूंनी तिला विकृतीच्या नजरेनं पाहिलं. अश्लील संदेश, टवाळक्या, मानसिक त्रास या सगळ्यांचा सामना करत तिनं स्वतःचा आत्मविश्वास गमवला नाही. ICC ने ट्रान्सजेंडर महिलांना महिलांच्या आंतरराष्ट्रीय संघांमध्ये खेळण्यास बंदी घातल्यानं तिच्या स्वप्नांना आणखी मोठा धक्का बसला.
सध्या अनाया बांगर मँचेस्टर (यूके) येथे स्थायिक असून UI/UX डिझायनर म्हणून काम करत आहे. तिने स्वतःची ‘Anaya Innovation’ नावाची कंपनी स्थापन केली आहे. सोशल मीडियावरून ती ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी जागरूकता वाढवण्याचे काम करत आहे.
अनाया बांगरची कहाणी केवळ लैंगिक ओळखीपुरती मर्यादित नाही, तर ती एका व्यक्तीने स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहून जग जिंकल्याची प्रेरणा देणारी कथा आहे. तिने केवळ आपलं स्वप्न जगण्याचं धाडस केलं नाही, तर इतर असंख्य ट्रान्सजेंडर लोकांना आवाज दिला आहे. आज ती एक व्यक्तिमत्त्व म्हणून समाजासमोर उभी आहे – अभिमानाने, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने.
इतर महत्त्वाच्या बातम्या



















