VIDEO : आर्यनची अनाया बनली, बांगरची लेक टीम इंडियाच्या युवा फलंदाजाच्या घरी पोहोचली, कुटुंबासोबत दंगामस्ती!
Anaya Bangar meets Sarfaraz Khan : आर्यनची अनाया बनली, बांगरची लेक टीम इंडियाच्या युवा फलंदाजाच्या घरी पोहोचली, कुटुंबासोबत दंगामस्ती

Anaya Bangar meets Sarfaraz Khan : भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्या मुलावर नुकतीच लिंग बदलाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे त्याचा मुलगा आता आर्यन राहिला नसून तो अनाया (Anaya Bangar) बनला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली अनाया बांगर भारतीय क्रिकेटपटू सरफराज खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली आहे. अनायाचे वडिल संजय बांगर हे भारतासाठी क्रिकेट खेळले आहेत. दरम्यान, सरफराजच्या घरी पोहोचल्यानंतर तिने त्याच्या वडिलांचीही भेट घेतली आहे. तिने थार गाडीवर बसून फोटो देखील काढले आहेत. आम्ही दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतो, असं अनायाने सांगितलं आहे.
View this post on Instagram
अनायाच्या आधी त्याचे नाव आर्यन होते. काही काळापूर्वी अनाया प्रसिद्धीच्या झोतात आली, जेव्हा ती तिचे लिंग बदलत असल्याचे उघड झाले. भारतात आल्यानंतर अनायाने एका मुलाखतीत खुलासा केला की जेव्हा त्याच्या काही सहकारी खेळाडूंना त्याच्याबद्दल कळले तेव्हा ते त्याला वाईट शिवीगाळ करायचे. तिने असेही म्हटले की एका क्रिकेटपटूला तिच्याशी संबंध ठेवायचे होते. दरम्यान सध्या ती तिचा बालपणीचा मित्र सरफराज खानच्या घरी पोहोचली, तिथून तिने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले.
सरफराज खानच्या घरी पोहोचली अनाया बांगर
अनायाने सरफराज खानची भेट घेतल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना तिने लिहिले की, "आमच्या तरुण पणात फोन आला. पण आम्ही लहानपणी आमच्या हाती फोन येण्यापूर्वी आम्ही बॅट घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. आम्ही सुरुवातीपासूनच चांगले मित्र. मुशीर खान, मला तुझी आठवण येते." मुशीर खान सध्या आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचा भाग आहे.
सरफराज खाननेही अनन्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आणि तिला भेटून खूप आनंद झाल्याचे सांगितले. ते सुमारे 2-3 वर्षांनी भेटत आहेत. फोटोमध्ये दोघेही थार कारवर बसलेले दिसत आहेत, जी सरफराजने काही दिवसांपूर्वी मॉडिफाय केली आहे. त्याच्या जर्सीवर 97 क्रमांकही लिहिलेला आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : वर-खाली, आडव्या-तिडव्या जबरदस्त उड्या मारल्या, टायगर श्रॉफचा हवेतील बॅलेन्सला तोड नाही



















