Ajinkya Rahane Record: 18 महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे याने टीम इंडियाचा डाव सावरलाय. आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर रहाणे टीम इंडियासाठी संकटमोचक झालाय. अजिंक्य रहाणे याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताकडून पहिले अर्धशतक झळकावलेय. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला जमले नाही, ते रहाणेने करुन दाखवलेय. विराट, रोहितसह दिग्गजांना मागे टाक अजिंक्यने विक्रमाला गवसणी घातली आहे. 


पाच हजार धावांचा पल्ला - 


टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळल्यानंतर रहाणेवरील जबाबदारी वाढली होती. अनुभव पनाला लावत रहाणे याने टीम इंडियाचा डाव सावरला. अजिंक्य रहाणे याने आधी जाडेजासोबत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर शार्दूल ठाकूर याच्यासोबत शतकी भागिदारी रचली. अजिंक्य रहाणे याने कसोटीतील पाच हजार धावांचा टप्पाही पार केला. भारताकडून कसोटीत पाच हजार धावांचा टप्पा पार करणारा 13वा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, दिलीप वेंगसरकर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ आणि कपिल देव यांनी केला होता.  त्याशिवाय अखेरच्या चार फलंदाजासोबत सर्वाधिक 100 धावांची भागिदारी करण्याचा पराक्रमही रहाणेच्या नावावर जमा झालाय. 










भारताच्या डावातील 46वे षटक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) टाकत होता. कमिन्सच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने खणखणीत षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने 92 चेंडूंचा सामना केला. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडला. हे रहाणेच्या कसोटी कारकीर्दीतील 26वे अर्धशतक ठरले. एवढेच नाही, तर तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडूही बनला.


अजिंक्य रहाणेचे जोरदार कमबॅक -


वयाच्या तिशीत असताना अजिंक्य रहाणेने संघातलं स्थान गमावलेलं. वनडे, टी-ट्वेन्टीचा वाढता परिणाम, प्रभाव. त्याला आलेलं ग्लॅमर हे सगळं असतानाच अजिंक्य संघातली जागा गमावून बसला होता. तरीही त्याने पुढची तीन वर्षे हार नाही मानली. यंदा मुंबईकडून खेळताना 2022-23 च्या स्थानिक मोसमात त्याने धावांचा रतीब घातला. त्याने टी-ट्वेन्टीचं विजेतेपद जिंकून दिलं. रणजी स्पर्धेवेळीही त्याने आपल्या बॅटचं पाणी दाखवलं. त्याच्या 11 इनिंगमध्ये 634 धावा ही त्याची कमाई. ज्यात होती दोन शतकं, सरासरी 57.63 ची.