Pakistan-Afghanistan War : अफगाणिस्तानच्या 3 खेळाडूंचा मृत्यू, आगळीक महागात पडली, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान
पाकिस्तानी सैन्याच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे.

Pakistan-Afghanistan War Update : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही दिसू येत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत (Tri-Series) सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या रोमांचक मालिकेवर अनिश्चिततेचे सावट आले आहे. हा निर्णय अरगुन जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर घेण्यात आला आहे, जिथे पाकिस्तानी सैन्याच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा (3 Cricketers Die In PAK Airstrike) मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील ही तिरंगी मालिका 17 ते 29 नोव्हेंबरदरम्यान पाकिस्तानमध्ये होणार होती. त्यासाठी अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तान दौर्यावर जाणार होता आणि तीनही संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार होते. विशेष म्हणजे, 17 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मालिकेचा उद्घाटन सामना खेळवला जाणार होता, तर 23 नोव्हेंबरला दोघांमध्ये दुसरी भिडंत होणार होती. मात्र आता ACB च्या नकारामुळे संपूर्ण मालिकेवर संकट ओढवले आहे.
Statement of Condolence
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 17, 2025
The Afghanistan Cricket Board expresses its deepest sorrow and grief over the tragic martyrdom of the brave cricketers from Urgun District in Paktika Province, who were targeted this evening in a cowardly attack carried out by the Pakistani regime.
In… pic.twitter.com/YkenImtuVR
हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध आधीच अत्यंत नाजूक स्थितीत आहेत. विशेष म्हणजे, या त्रिकोणी मालिकेची घोषणा त्या काळात करण्यात आली होती, जेव्हा दोन्ही देशांमधील सीमेवरील वाद आणि इतर प्रश्न तीव्र स्वरूपात समोर येत होते. यादरम्यान, भारतानेही पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकांपासून अनेक वर्षे दूर राहण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळवली गेली होती, तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौर्यावर आला होता. तर टीम इंडिया 2005-06 नंतर आजपर्यंत पाकिस्तान दौर्यावर गेलेली नाही. आता या यादीत अफगाणिस्तानचा नावही समाविष्ट झाला आहे.
पाकिस्तानला मोठे नुकसान होईल का?
दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप या विषयावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. पण, मालिकेसाठी पर्यायी संघ शोधण्यासाठी बोर्ड आपत्कालीन बैठक बोलावू शकते. जर मालिका पूर्णपणे रद्द झाली तर पीसीबीला प्रसारण हक्क, तिकीट विक्री आणि प्रायोजकत्वासह कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
हे ही वाचा -
















