Abrar Ahmed On Kavya Maran: काव्या मारन (Kavya Maran) यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड 2026 च्या (sunrisers leeds) ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमद (Abrar Ahmed) याला संघात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. काव्या मारनने अबरार अहमदला संघात घेतल्यानंतर भारतातून एकच संताप व्यक्त करण्यात आला. याचदरम्यान, आता अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील (PCB) अंतर्गत सूत्रांनी 'TelecomAsia'ला सांगितले की, अबरार अहमद या वादामुळे ना अस्वस्थ आहे, ना तो त्याबद्दल चिंतीत आहे. सनरायझर्सने अबरार अहमदला संघात घेतल्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांबाबत अबरार अहमदला काहीच आश्चर्य वाटले नाही. कारण अशा प्रकारचा प्रतिसाद मिळणार याची अबरार अहमदला आधीच कल्पना होती. त्यामुळे या वादाबाबत मला अजिबात चिंता नसल्याची प्रतिक्रिया अबरार अहमदने दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील सदर विषय केवळ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि संबंधित फ्रँचायझी यांच्यापुरताच मर्यादित आहे.
सुनील गावसकरांनी देखील काव्या मारनला सुनावलं- (sunil gavaskar on abrar ahmed)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकरांनी देखील काव्या मारनला सुनावलं आहे. भारतीय मालकीची संस्था किंवा तिची परदेशातील शाखा जर अशा प्रकार पाकिस्तानी खेळाडूला पैसा देत असेल तर ती अप्रत्यक्षपणे भारतीयांच्या जीवितहानीत योगदान देत आहे. संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी न्यूझीलंडचे असल्याने त्यांना या संवेदनशील बाबींची जाणीव नसावी. परंतु मालकांनी परिस्थिती बघून निर्णय घ्यायला हवा होता, असं सुनील गावसकर म्हणाले.
सनरायझर्स लीड्सकडून स्पष्टीकरण- (sunrisers leeds react on abrar ahmed)
अबरार अहमदला संघात घेण्याच्या आपल्या निर्णयाबाबत सनरायझर्स लीड्सने एक निवेदनही जारी केले. सनरायझर्स लीड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीने (Daniel Vettori) म्हटलं की, अबरार अहमदच्या गोलंदाजीत प्रचंड विविधता आहे. तसेच इंग्लंडमधील स्थानिक खेळाडूंनी यापूर्वी कधीही त्याचा सामना केलेला नाही. लिलावात उपलब्ध असलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी बोली लावण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीने उतरलो होतो. जेव्हा हा पर्याय आमच्यासाठी उपलब्ध झाला, त्यावेळी अनेक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिरकी गोलंदाज संभाव्य निवडीसाठी उपलब्ध होते. परंतु आमची प्राथमिकता अबरार अहमदला आमच्या संघात घेणे हीच होती, असं डॅनियल व्हेटोरीने स्पष्ट केले.
अबरार अहमदची कारकीर्द- (Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge)
27 वर्षीय अब्रार अहमदने पाकिस्तानसाठी 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 52 विकेट्स आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, त्याने 6.67 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. त्याच्या एकूण टी-20 क्रिकेट कारकिर्दीचा विचार करता, त्याने 84 सामन्यांमध्ये 109 विकेट्स पटकावल्या आहेत.
