India A vs Australia A 1st ODI : आशिया कप 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं. तसेच या स्पर्धेत अभिषेक शर्माला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. ज्यातील दुसऱ्या सामन्यात 2025 च्या आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा अभिषेक शर्मा पण खेळत आहे. अभिषेक शर्माच्या या यशामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा मोठा वाटा आहे. सध्या प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगला युवराज सिंग प्रशिक्षण देतोय, जे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळत आहे.

Continues below advertisement

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सामन्यात अभिषेक शर्मा वाईटरित्या अपयशी ठरला, तो फक्त एक चेंडू खेळल्यानंतरही धाव न करता (Abhishek  sharma out on duck vs australia A) पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलिया अ संघाचा कर्णधार जॅक एडवर्ड्सने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये शानदार फलंदाजी केली होती.

युवराज सिंगचे दोन्ही एक्के ऑस्ट्रेलियाविरुद्ध फ्लॉप

पहिल्या अनधिकृत सामन्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारत अ संघाची दुसऱ्या सामन्यात निराशाजनक सुरुवात झाली. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळला नव्हता, ज्यामध्ये प्रियांश आर्यने प्रभसिमरन सिंगसोबत डावाची सुरुवात केली होती आणि शतक झळकावले. पण, त्याच्या जागी अभिषेकला संधी मिळाली, जो टी-20 चा सुपरस्टार आहे. पण तो वनडेत त्याचे खातेही उघडू शकला नाही. शिवाय, त्याच्यासोबत डावाची सुरुवात करणारा प्रभसिमरन सिंग देखील फक्त एका धावेवर बाद झाला. या दोन्ही खेळाडूंना युवराज सिंग प्रशिक्षण देतोय, जे ऑस्ट्रेलियाविरुद्ध फ्लॉप ठरले.

श्रेयस अय्यर देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत फ्लॉप

अभिषेक शर्माने आशिया कप 2025 च्या स्पर्धेत सात सामन्यांमध्ये 44.85 च्या सरासरीने 314 धावा केल्या, तीन अर्धशतके ठोकली. त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला, परंतु ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धचा त्याचा डाव खराब राहिला. मागील सामन्यात शानदार शतक झळकावणारा श्रेयस अय्यर देखील लवकर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कर्णधार श्रेयस अय्यरही अपयशी ठरला आणि त्याने 13 चेंडूत आठ धावा केल्या. भारताने फक्त 17 धावांत तीन विकेट गमावल्या. दुसऱ्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, हर्षित राणा, युधवीर सिंग चरक, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई.