Abhishek Sharma Two ducks in T20 World Cup 2026 : कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 चा महासंग्राम रंगात आला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले आणि सुरुवातीलाच सामन्याला नाट्यमय वळण मिळाले. भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा (Salman Ali Agha) याने षटकाच्या अखेरच्या चेंडूवर आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) झेलबाद करत भारताचा पहिला बळी घेतला. अभिषेक शून्यावर माघारी परतल्याने स्टेडियममध्ये क्षणभर शांतता पसरली.

Continues below advertisement

टी-20 वर्ल्डकपमध्ये शून्याचा फेरा! (Abhishek Sharma Two ducks in two matches)

Continues below advertisement

अभिषेक पाकिस्तानविरुद्ध आपले खातेही उघडू शकला नाही आणि शून्य धावांवर बाद झाला. एवढेच नाही तर, या स्पर्धेत तो आतापर्यंत आपले खातेही उघडू शकला नाही. अभिषेक शर्मा यापूर्वी अमेरिकेविरुद्ध शून्य धावांवर बाद झाला होता. आता तो पाकिस्तानविरुद्धही खाते उघडू शकला नाही. अभिषेक पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी आजारी होता आणि या सामन्यासाठी परतला. पण, तो परतताना अपयशी ठरला आणि शून्य धावांवर बाद झाला.

रोहित शर्माची रिॲक्शन व्हायरल

या सामन्यासाठी टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी माजी कर्णधार रोहित शर्मा स्वतः कोलंबोमध्ये उपस्थित होता. मात्र अभिषेकचा विकेट पडताच रोहितचा चेहरा क्षणभर पडलेला दिसला. तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल झाला आहे.

भारतीय संघात 2 बदल...

मागील सामना दुखापतीमुळे चुकवलेल्या अभिषेक शर्माची संघात पुनरागमन झाले आहे. तर खेळपट्टीच्या परिस्थितीचा विचार करून अर्शदीप सिंगऐवजी अतिरिक्त फिरकीपटू कुलदीप यादवला अंतिम अकरात स्थान देण्यात आले आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन : 

अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन :

सॅम अयूब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अशरफ, उस्मान खान (यष्टीरक्षक), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि उस्मान तारिक.

हे ही वाचा -

Ind vs Pak Live : पाकिस्तानची बोलती बंद, टॉसच्या वेळी सूर्यकुमार यादवने नेमकं काय केलं? पाहा Video