एक्स्प्लोर

IND vs PAK Asian Games 2026 Final : वैभवला पाहून पाक खेळाडूने नको ते कृत्य केलं, अभिषेकने धू धू धुतलं; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO

India VS Pakistan Asian Games 2026 Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील क्रिकेटचा सुवर्णपदकाचा सामना आज, 3 ऑक्टोबर रोजी जपानमध्ये खेळला जात आहे.

India VS Pakistan Asian Games 2026 Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील क्रिकेटचा सुवर्णपदकाचा सामना आज, 3 ऑक्टोबर रोजी जपानमध्ये खेळला जात आहे. या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

वैभवला पाहून पाक खेळाडूने नको ते कृत्य केलं

भारताच्या डावाची सुरुवात मात्र वादळी झाली. मात्र, तिसऱ्या षटकात 28 धावांवर सॅम अय्युबने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला यष्टीरक्षक उस्मान खानकरवी झेलबाद केले. वैभवने आक्रमक सुरुवात करत 9 चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने 15 धावा केल्या. वैभवची विकेट घेतल्यानंतर सॅम अय्युबने केलेल्या सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा रंगली. वैभवला बाद केल्यानंतर त्याने केलेल्या या कृतीमुळे मैदानावरील वातावरण काही काळ तापल्याचं पाहायला मिळालं.

अभिषेक शर्माचा पलटवार!

वैभवची विकेट पडल्यानंतर अभिषेक शर्माने मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुफान हल्ला चढवला. चौथ्या षटकात भारताची दुसरी विकेट पडली. अहमद दानियालने संजू सॅमसनला अराफत मिन्हासकरवी झेलबाद केलं. संजूला केवळ 2 धावा करता आल्या. यानंतर अभिषेकने आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने अवघ्या 20 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 13वं अर्धशतक ठरलं.

अभिषेकने धू धू धुतलं

अभिषेकने 28 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 61 धावांची वादळी खेळी केली. मात्र अराफत मिन्हासच्या गोलंदाजीवर तो यष्टीचीत झाला. आठव्या षटकात 93 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने डावाची सूत्रं हाती घेतली. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या 3 बाद 103 धावा अशी होती.

हे ही वाचा - 

IND vs PAK Asian Games 2026 Final : वैभवला बाद केलं अन् पाक खेळाडूचं वादग्रस्त सेलिब्रेशन; भारत-पाकिस्तान ड्रामा, मैदानावर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget