एक्स्प्लोर

Abhishek Sharma : अभिषेक शर्मा तापाने फणफणला; मॅच सुरु असताना अचानक बिघडली तब्येत, पुढच्या मॅचमधून OUT, टीम इंडियात खळबळ

Abhishek Sharma T20 World Cup 2026 :टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार सुरू झाला असून यंदा ही स्पर्धा भारतातच खेळवली जात आहे.

Abhishek Sharma T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार सुरू झाला असून यंदा ही स्पर्धा भारतातच खेळवली जात आहे. गतविजेते म्हणून टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला फिटनेसच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकामागून एक खेळाडू दुखापत किंवा आजारपणामुळे त्रस्त होत असल्याने टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराहनंतर आता युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याचाही या यादीत समावेश झाला आहे. अमेरिका (USA) विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यादरम्यान अभिषेकची अचानक तब्येत बिघडली.

शनिवार 7 फेब्रुवारी रोजी भारताने वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात अमेरिकेचा सामना केला. प्रथम फलंदाजी करत भारताने 9 विकेट्स गमावत 161 धावा केल्या. मात्र अमेरिकेच्या डावादरम्यान अचानक अभिषेक मैदानावरून बाहेर गेला. सुरुवातीला तो फील्डिंगसाठी मैदानावर दिसत होता, पण त्यानंतर तो पुन्हा मैदानात परतलाच नाही. तो डगआउटमध्येही इतर खेळाडूंमध्ये दिसला नाही, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

अभिषेकला नेमकं काय झालं?

सामन्यादरम्यान अभिषेकला कोणतीही दुखापत झाल्याचं दिसून आलं नव्हतं. मात्र सामन्यानंतर याचं कारण स्पष्ट झालं. कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, अभिषेक आजारी पडला होता. त्याचवेळी त्याने हेही उघड केलं की जसप्रीत बुमराहलाही सामन्यापूर्वी तीव्र ताप आला होता.

यानंतर मोहम्मद सिराजने अभिषेकच्या तब्येतीबाबत अधिक माहिती दिली. सिराजच्या मते, अभिषेकला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्याची प्रकृती लक्षात घेता त्याला पुन्हा फील्डिंगसाठी उतरवण्यात आलं नाही. त्याच्या जागी सब्स्टिट्यूट फील्डर म्हणून संजू सॅमसन मैदानात उतरला.

पुढील सामन्यात पुनरागमन?

दरम्यान, सिराजने चाहत्यांसाठी दिलासादायक बातमीही दिली. त्याच्या मते, अभिषेक पुढील सामन्यासाठी पूर्णपणे फिट असेल आणि तो पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची झलक दाखवेल. अमेरिकेविरुद्धचा सामना अभिषेकसाठी अत्यंत निराशाजनक ठरला होता. तो अवघ्या एका चेंडूत शून्यावर बाद झाला. हा त्याचा भारतासाठी सीनियर आयसीसी स्पर्धेतील पहिलाच सामना होता. डेब्यू सामना अपेक्षेप्रमाणे न गेल्याची खंत अभिषेकलाही असेल. मात्र 12 फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो ही कमतरता भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा -

Rohit Sharma News : रोहित शर्मा चक्क अंबानींना नको बोलला, वानखेडेच्या VIP बॉक्समध्ये मॅच सुरु असताना नेमकं काय घडलं?, पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...
'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
Embed widget