Abhishek Sharma Golden Duck SRH vs RR IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल 2026 मधील 21व्या सामन्यात मोठा धक्का बसला. अभिषेक शून्यावर बाद झाला आणि याचबरोबर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा डकवर बाद होणारा भारतीय खेळाडू असा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.
रोहित- संजूचा नकोसा विक्रम आता अभिषेकच्या नावावर (Abhishek Sharma Golden Duck)
2026 या वर्षात अभिषेकने आतापर्यंत 18 टी-20 डाव खेळले असून त्यात तब्बल 7 वेळा तो खातेही न उघडता माघारी परतला आहे. याआधी रोहित शर्मा (2018) आणि संजू सॅमसन (2024) याने प्रत्येकी 6 वेळा शून्यावर बाद होत, दुसऱ्या स्थानावर नोंद केली होती. तर गुरकीरत सिंह मान 2013 मध्ये 5 वेळा डकवर बाद झाला होता.
या सामन्यात आणखी एक अनोखा योगायोग घडला. हैदराबादच्या सनराइजर्स हैदराबाद संघाकडून आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा अभिषेक दुसरा फलंदाज ठरला. त्याआधी शिखर धवन 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अशाच प्रकारे पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. या वेळी अभिषेकला जॉफ्रा आर्चर याने पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल भारतीय खेळाडू
अभिषेक शर्मा - 7 वेळा (2025)रोहित शर्मा - 6 वेळा (2018)संजू सॅमसन - 6 वेळा (2024)गुरकीरत सिंग मान - 5 वेळा (2013)
2026 मध्ये अभिषेक शर्मा किती वेळा शून्यावर बाद झाला?
0 (1) विरुद्ध न्यूझीलंड (रायपूर)0 (1) विरुद्ध न्यूझीलंड (विशाखापट्टणम)0 (1) विरुद्ध अमेरिका (मुंबई)0 (4) विरुद्ध पाकिस्तान (कोलंबो)0 (3) विरुद्ध नेदरलँड्स (अहमदाबाद)0 (2) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (हैदराबाद)0 (1) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (हैदराबाद)
हे ही वाचा -
