Abhishek Nayar News : ज्याला BCCIनं अचानक काढून टाकलं, आता त्याच पठ्ठ्याला मिळाली मोठी जबाबदारी, 'या' संघाचा बनला हेड कोच
भारतीय क्रिकेट नियामक मंडळने ज्याला टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून काढून टाकले होते, तो अभिषेक नायर आता मोठ्या भूमिकेत दिसणार आहे.

Abhishek Nayar new head coach of UP Warriorz in WPL : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने ज्याला टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून काढून टाकले होते, तो अभिषेक नायर आता मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. विमेन्स प्रीमियर लीगमधील ‘UP वॉरियर्स’ या संघाने त्याला हेड कोच म्हणून नियुक्त केलं आहे. अभिषेक नायर आयपीएल 2025 च्या दरम्यान टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने लगेचच आपल्या जुन्या संघात म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मध्ये पुनरागमन केलं. आणि आता ते थेट WPL संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
'UP वॉरियर्स'कडून मोठी जबाबदारी
UP वॉरियर्स संघाने अभिषेक नायरला हेड कोचपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. त्याने यापूर्वी तीन वर्षे संघाचं नेतृत्व केलेले माजी भारतीय ऑलराउंडर जॉन लुईस यांची जागा घेतली आहे. WPL च्या 2023 च्या पहिल्या हंगामामध्ये UP वॉरियर्स प्लेऑफपर्यंत पोहोचले होते, मात्र पुढील दोन हंगामातमध्ये त्यांचा कामगिरीत घसरण झाली.
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि KKR ला दिलं विजेतेपद
फेब्रुवारीत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तेव्हा अभिषेक नायर हा गौतम गंभीरच्या कोचिंग टीमचा भाग होता. त्यानंतर त्याने आयपीएल 2025 मध्ये पुन्हा KKR मध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केलं. याआधीही तो केकेआर संघाचा महत्त्वाचा भाग राहिला होता आणि 2024 च्या विजयी मोहिमेत गंभीरसोबत त्याचं योगदान मोठं होतं.
🚨 JUST IN: Abhishek Nayar has been named the new head coach of UP Warriorz ahead of #WPL2026 #wpl #abhisheknayar #upwarriorz pic.twitter.com/bWdnWum6Hk
— Cricbuzz (@cricbuzz) July 25, 2025
नायर भावुक, म्हणाला, “हे काम पूर्वीही केलंय, आता जबाबदारी मोठी”
अभिषेक नायर पहिल्यांदाच UP वॉरियर्ससोबत जोडला नाही. याआधी पहिल्या सिझननंतर झालेल्या ऑफ-सीझन ट्रेनिंग कॅम्पमध्येही त्याने संघासोबत काम केलं होतं. फ्रेंचायझीला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली संघात अधिक सुसंगतता आणि खोली निर्माण होईल. नायर म्हणाला की, “मी यापूर्वीही UP वॉरियर्ससोबत काम केलं आहे आणि त्याचा मला खूप आनंद मिळाला होता. आता हेड कोचची भूमिका मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. WPL हा महिला क्रिकेटसाठी एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. आगामी सिझनसाठी भक्कम संघ उभा करण्यासाठी मी व्यवस्थापनासोबत काम करण्यास तयार आहे.”
हे ही वाचा -





















