एक्स्प्लोर

AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं

South Africa vs Australia WCL 2026 : एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याच्या जलवा आजही कायम आहे.

AB De Villiers 37-Ball Century WCL 2026 : एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याच्या जलवा आजही कायम आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज फलंदाजाने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीची झलक दाखवली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्समध्ये डिव्हिलियर्सने अवघ्या 37 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सने ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सचा धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सने पाच गडी गमावून 209 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सने अवघ्या 15.4 षटकांत दोन गडी गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं.

डिव्हिलियर्सचं वादळी शतक

210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. केन रिचर्डसनने फॅफ डु प्लेसिसला अवघ्या पाच धावांवर बाद केलं. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. डिव्हिलियर्सने अवघ्या 37 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्याने 40 चेंडूंचा सामना करताना सहा चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने नाबाद 111 धावांची खेळी केली. त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय सोपा झाला.

दुसऱ्या बाजूला रिचर्ड लेव्हीनेही शानदार फलंदाजी केली. त्याने 29 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. डिव्हिलियर्स आणि लेव्ही यांनी मिळून 127 धावांची भागीदारी केली. लेव्ही बाद झाल्यानंतर जेपी ड्युमिनीने डिव्हिलियर्सला साथ दिली आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

शॉर्ट आणि वॉर्नरची फटकेबाजी व्यर्थ

त्याआधी ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सकडून डार्सी शॉर्ट आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच उस्मान ख्वाजाच्या रूपात धक्का बसला. तो नऊ धावा करून माघारी परतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि डार्सी शॉर्ट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत डाव सावरला. शॉर्टने अवघ्या 25 चेंडूंमध्ये सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 66 धावा कुटल्या. तर वॉर्नरने 37 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह 48 धावा केल्या.

जो बर्न्सने 25 चेंडूंमध्ये नाबाद 28 धावा केल्या. त्याच्या खेळीत एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. जोनाथन वेल्सनेही 12 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एका षटकारासह 23 धावा केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या या फटकेबाजीवर डिव्हिलियर्सच्या वादळी शतकाने पाणी फेरलं. त्याच्या नाबाद 111 धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सने दणदणीत विजय मिळवला. 

हे ही वाचा -

IND vs WI 2nd T20 : रांचीत धावांचा पाऊस! भारत-वेस्ट इंडिज सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच 'हा' घडला चमत्कार, नेमकं काय झालं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs NZ 2nd ODI Team India Playing XI: मोहम्मद सिराज IN...; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
मोहम्मद सिराज IN...; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
IND vs NZ 1st ODI : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Embed widget