एक्स्प्लोर

टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा

417 runs in 20 overs England Club Cricket : टी-20 क्रिकेटमध्ये सध्या धावांचा पाऊस पडणे सामान्य झाले आहे, परंतु इंग्लंडमधील एका स्थानिक सामन्यात फलंदाजांनी धुमाकूळ घातला.

417 runs in 20 overs England Club Cricket : टी-20 क्रिकेटमध्ये सध्या धावांचा पाऊस पडणे सामान्य झाले आहे, परंतु इंग्लंडमधील एका स्थानिक सामन्यात फलंदाजांनी असा धुमाकूळ घातला की थेट क्रिकेट जगताचे डोळे दिपले. एका टी-20 सामन्यात संपूर्ण संघाने तब्बल 417 धावांचा डोंगर उभा केला, तर एका फलंदाजाने अवघ्या 55 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा अद्भूत पराक्रम केला. इंग्लंडमधील एका क्लब क्रिकेट सामन्यात ही ऐतिहासिक आणि थरारक कामगिरी पाहायला मिळाली आहे. या संपूर्ण डावात तब्बल 47 षटकार आणि 22 चौकारांची आतिषबाजी करण्यात आली.

डम्बलटन क्रिकेट क्लबचा ऐतिहासिक पराक्रम

7 जुलै रोजी इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या प्रीमियर वन टॉप टियर डिव्हिजनच्या एका सामन्यात डम्बलटन क्रिकेट क्लब आणि हेरदली रेडिंग्स हे संघ आमनेसामने होते. डम्बलटन क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात जे घडले ते क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. 20 षटकांच्या खेळात डम्बलटनच्या फलंदाजांनी विरोधी गोलंदाजांना धु-धु-धूतले अवघ्या 2 बाद 417 धावा केल्या.

इवान गेगचे वादळी द्विशतक

डम्बलटन संघाचा सलामीवीर इवान गेग या सामन्याचा खरा नायक ठरला. त्याने मैदानाच्या चारी बाजूंना चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 55 चेंडूंमध्ये 206 धावांची स्फोटक खेळी खेळली. टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. इवानने आपल्या या वादळी खेळीत 13 चौकार आणि 23 गगनचुंबी षटकार ठोकले. त्याला दुसऱ्या टोकाकडून डेन हॉलंडने चोख साथ दिली. हॉलंडने अवघ्या 37 चेंडूंत 122 धावांची धडाकेबाज खेळी केली.

418 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना हेरदली रेडिंग्स संघाची अवस्था बिकट झाली. मात्र, त्यांच्या ब्लूमफील्ड नावाच्या फलंदाजाने एकतर्फी संघर्ष सुरू ठेवला. ब्लूमफील्डने 48 चेंडूंत 6 चौकार आणि 12 षटकांरांच्या मदतीने 109 धावांची शतकी खेळी केली. परंतु, इतर फलंदाजांच्या अपयशामुळे त्यांचा संपूर्ण संघ 229 धावांवर गारद झाला. डम्बलटन क्रिकेट क्लबने हा सामना 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून इतिहास रचला.

आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलचे रेकॉर्ड्स

सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटचा विचार केला, तर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर आहे. झिम्बाब्वेने ऑक्टोबर 2024 मध्ये गांबियाविरुद्ध 20 षटकांत 344/4 धावा केल्या होत्या. तर भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघाने डिसेंबर 2024 मध्ये सिक्कीमविरुद्ध 349/5 धावा केल्या होत्या. जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएल (IPL) मध्ये अजूनही 300 धावांचा टप्पा पार झालेला नाही, तिथला सर्वोच्च स्कोअर 287 धावांचा आहे. हा क्लब सामना असला, तरी 120 चेंडूंत 417 धावांचा आकडा पार करणे ही क्रिकेट विश्वातील एक अद्भूत घटना मानली जात आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 धावांचा हा टप्पा कधी पार होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -

IND vs SL U19 3rd Youth ODI : टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget