World Cup 2023 : ज्या देशात क्रिकेटला धर्म समजतात त्या भारतामध्ये क्रिकेट वर्ल्डकप सुरू आहे. त्यामुळे क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. टीम इंडियाचेच नव्हे तर प्रत्येक संघाची मॅच भारतीय प्रेक्षकांकडून मोठ्या उत्साहाने पाहिली जात आहे त्यामुळे मैदानात मॅच पाहण्यामध्ये अनेक अनेक विक्रम होत आहेत.


नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये विराट कोहलीचं सचिनच्या बरोबरीचे शतक चार कोटी तीस लाख प्रेक्षक काळजाचा ठोका थांबवून पाहत होते. मात्र, विराट 95 धावांवर बाद झाला. यावरून भारतामध्ये वर्ल्डकप फीवर लक्षात घेण्यास पुरेसा आहे.


दरम्यान, भारतामध्ये होत असलेल्या वर्ल्डकपमध्ये मॅचच्या मध्यात मॅच पाहण्याचे विक्रम मोडीत निघाले आहेत. मॅच मध्यामध्ये असताना सर्वाधिक प्रेक्षक हजेरी लावत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. हा आजवरचा विक्रम आहे. कारण 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये मॅच मध्यामध्ये असताना एक लाख 90 हजार प्रेक्षकांनी पाहिली होती. मात्र हाच आकडा आता 2023 मध्ये त्याच्या तिपटीच्या घरात गेला (enue Attendances Till Midway More Than 190K Compared to 2019 WC) आहे. 






2023 मध्ये वर्ल्डकप सुरू असताना आतापर्यंत मॅच मध्यामध्ये असतानाच 5 लाख 42 हजार चाहत्यांनी मॅच पाहिली आहे त्यामुळे एकंदरीतच दुपारी सुरू झाल्यानंतर मॅच मध्यामध्ये आल्यानंतरच पाहण्यामध्ये भारतीय प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. 






दुसरीकडे आज चेन्नईच्या स्टेडियमवर वर्ल्डकपमधील अखेरचा सामना होत आहे. या ठिकाणी सुद्धा पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये सामना होत असतानाही तब्बल 27,300 प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे. यावरून वर्ल्ड कपची उत्सुकता दिसून येते.






दक्षिण आफ्रिका गेल्या काही मॅचमध्ये भलत्याच फॉर्ममध्ये आहे, तर पाकिस्तान करूया मरो या स्थितीमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी चाहत्यांनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या