बंगळुरु : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. महिला, सेक्स आणि समानता याविषयी खालच्या पातळीवर टिपण्णी केल्याने गेलवर टीकेची झोड उठली आहे.

 
द टाईम्स या ब्रिटीश वृत्तपत्राची महिला पत्रकार शार्लेट एडवर्ड्स यांच्याशी बोलताना गेलची भाषा घसरली. 'माझ्याकडे जगातली सर्वात मोठी बॅट आहे. तुला वाटतं का तू ती उचलू शकशील? मला वाटतं ती धरायला तुला दोन हात लागतीलच.' असा चहाटळपणा त्याने केला.

 
एडवर्ड यांनी गेलचे हा अश्लाघ्यपणा स्पष्ट करुन सांगितला आहे. 'आतापर्यंत किती कृष्णवर्णीय पुरुष तुला मिळाले? तू कधी थ्रीसम केलं आहेस का? मी पैज लावून सांगतो तू केलं असशील. सांग ना' असे अभद्र प्रश्न गेलने विचारल्याचं त्या सांगतात.

 
'दहा हजार मुली माझ्यावर स्वतःला झोकून देतील. कारण मी गुड लूकिंग आहे' असं गेल गर्विष्ठपणे म्हणतो. जानेवारी महिन्यातच महिला प्रेझेंटरशी केलेली सलगी त्याला महागात पडली होती. याबद्दल ख्रिस गेलला दंडही ठोठावण्यात आला होता.

 

 

मागच्या वेळीचं प्रकरण काय?

 

 

बिग बॅश लीग मेलबर्न रेनिगेड्स विरुद्ध होबार्ट हरिकेन्स यांच्यात सामना रंगला होता. 15 चेंडूत 41 धावांची तुफानी खेळी करणारा ख्रिस गेल जेव्हा डगआऊटमध्ये पोहोचला, त्यावेळी चॅनल 10 ची पत्रकार मेल मॅकलॉगलिन त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी आली. मात्र गेल तिला म्हणाला की, "खरंतर मला तुझी मुलाखत घ्यायची होती. केवळ तुझे डोळे पाहण्यासाठी मी ही खेळी रचली. तुझे डोळे खूपच सुंदर आहेत." एवढ्यावरच गेल थांबला नाही. तो पुढे म्हणाला की, "आजच्या सामन्यानंतर आपण दोघे एकत्र ड्रिंकसाठी जाऊ. आता इतकी लाजू नको."

 

 

गेलच्या फ्लर्टिंगचा व्हिडिओ


 

 

संबंधित बातम्या :


सलमानच्या हिरोईनसोबत ख्रिस गेलची पार्टी!


ख्रिस गेलला दंड, महिला पत्रकारासोबत फ्लर्टिंग महागात


तो निव्वळ विनोद होता, फ्लर्टिंग वादानंतर गेलचा माफीनामा


महिला रिपोर्टरवर कमेंट करणाऱ्या ख्रिस गेलवर जोरदार टीका