Champions Trophy 2025 All Teams Jersey Price : चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलीये. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी जगभरातून संघांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सर्व संघ त्यांची जर्सी लाँच करताना पाहायला मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणत्या संघाच्या जर्सीची किंमत किती आहे आणि कोणत्या संघाची जर्सी  सर्वात महाग आणि जर्सी स्वस्त आहे. अनेक संघांच्या जर्सी अधिकृतपणे लाँच करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही संघांच्या जर्सी आयसीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

बीसीसीआयने नवीन वनडे जर्सी जाहीर केली असली तरी चॅम्पियन्स ट्रॉफीची अधिकृत जर्सी लाँच केलेली नाही. ICC वेबसाइटवर टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जर्सीची किंमत 4500 भारतीय रुपये आहे. टीम इंडियाच्या नवीन वनडे जर्सीची किंमत 5,999 रुपये आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची जर्सी यजमान पाकिस्तानने जारी केली आहे. पाकिस्तानने स्पर्धेच्या जर्सीची किंमत 40 अमेरिकन डॉलर (सुमारे 3500 भारतीय रुपये) ठेवली आहे.

अफगानिस्तानच्या जर्सीची किंमत किती? 

चॅम्पियन्स ट्रॉफीची जर्सीही अफगाणिस्तानने जाहीर केली आहे. आयसीसीच्या वेबसाइटवर अफगाणिस्तानच्या जर्सीची किंमत सुमारे 4500 भारतीय रुपये ठेवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, न्यूजीलैंड, इंग्लैंड आणि दक्षिण आफ्रिका

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अधिकृतपणे जर्सी जाहीर केलेली नाहीत. मात्र, या संघांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जर्सी आयसीसीच्या जागतिक वेबसाइटवर उपलब्ध आहेत. सर्व जर्सींची किंमत सुमारे 4500 भारतीय रुपये आहे. आता सर्व संघ अधिकृतपणे जर्सी कधी जाहीर करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kavya Maran : काव्या मारनने झटक्यात खर्च केले 1 हजार कोटी! हैदराबादच्या मालकीणीने थाटात खरेदी केला आणखी एक संघ!