Afghanistan qualified Champions Trophy : अफगाणिस्तानने विश्वचषक 2023 च्या 34व्या सामन्यात नेदरलँड्सचा 7 गडी राखून पराभव करून स्पर्धेतील चौथा विजय नोंदवला. या विजयानंतर अफगाणिस्तान टीमला त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठं रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. अफगाणिस्तान टीम पुढील वर्षी पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे अफगाण क्रिकेटमध्ये हा मैलाचा दगड गाठला गेला आहे. 






अफगाण टीमची विजयी हॅट्ट्रिक अन् नशिबाचं दार उघडलं!


पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी टीम इंडिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान पात्र ठरला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा चौथा विजय हा चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड आणि आधीच खराब स्थितीत असलेल्या पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरू शकतो. अफगाण संघाच्या विजयानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीत रंजक वळण येऊ शकते. न्यूझीलंड आणि पाकिस्तानसाठी डोकेदुखी होऊ शकते. 






अफगाणिस्तानने नेदरलँडचा पराभव करून न्यूझीलंडशी गुणांची बरोबरी केली आहे. दोन्ही संघांनी 7-7 सामन्यांनंतर चार विजय मिळवले आहेत. मात्र, निव्वळ धावगतीच्या फरकामुळे अफगाणिस्तान पाचव्या स्थानावर एक स्थानाने खाली आहे. न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तान आपले दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे संपुष्टात आणू शकतो आणि न्यूझीलंडच्या दोन्ही विजयानंतरही नेट रनरेटमध्ये त्याचा पराभव करून चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो.






पण पुढील दोन सामने जिंकणे अफगाणिस्तानसाठी इतके सोपे नसेल, कारण संघाचा आठवा आणि नववा सामना अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे आणि दोन्ही संघ अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र अफगाणिस्तान केवळ एका विजयानेही पाकिस्तानचा खेळ खराब करू शकतो. कारण पाकिस्तानने 7 पैकी 3 सामने जिंकले असून अफगाणिस्तानने 4 सामने जिंकले आहेत.


पाकिस्तानच्या विजयाचा अफगाणिस्तानला फायदा होऊ शकतो


पाकिस्तान पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे, ज्यामध्ये विजय मिळवून पाकिस्तानी संघ किवी संघाला 8 गुणांवर कायम ठेवू शकतो, जो अफगाणिस्तानसाठी फायदेशीर ठरेल. पाकिस्तानसाठी हा न्यूझीलंडविरुद्ध लढा किंवा मरो असा सामना असेल. त्यानंतर पाकिस्तान पुढील साखळी सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. आता सर्व काही अफगाणिस्तानच्या पुढील दोन सामन्यांवर अवलंबून असेल. अफगाणिस्तान संघाने दोन्ही सामने कसे तरी जिंकले तर उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित होईल.


इतर महत्वाच्या बातम्या